28 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रSupriya Sule : गुजराती गरब्याच्या तालावर सुप्रिया सुळे बेभान, स्पेशल डान्सचा व्हिडिओ...

Supriya Sule : गुजराती गरब्याच्या तालावर सुप्रिया सुळे बेभान, स्पेशल डान्सचा व्हिडिओ तुफान व्हायरल

बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे लवयात्री चित्रपटाच्या 'चोगाडा' या गाण्यावर नाचत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. इंदापूर येथील लाखेवाडी येथे झालेल्या या कार्यक्रमात शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.

देशभरात सध्या सर्वत्र नवरात्रीचा सण जल्लोषात साजरा केला जात आहे. अनेक लोक याकाळात गरबा खेळण्यात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार आणि शरद पवार यांची लेक सुप्रिया सुळे यांना देखील गरब्याच्या तालावर थिरकण्याचा मोह अनावर झाला. सुप्रिया सुळे यांचा गरबा खेळतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील इंदापूर येथील नवरात्रीच्या कार्यक्रमातील आहे. या कार्यक्रमात सुळे डान्स करताना दिसल्या. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे लवयात्री चित्रपटाच्या ‘चोगाडा’ या गाण्यावर नाचत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. इंदापूर येथील लाखेवाडी येथे झालेल्या या कार्यक्रमात शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.

हे सुद्धा वाचा

Nitin Gadkari : गरीब-श्रीमंतीचे अंतर कमी झाले पाह‍िजे – नितीन गडकरी

Katrina Kaif : कतरिना कैफसोबतच्या नव्या सिनेमाबाबत अली जफरने दिली खास अपडेट

Rohit Sharma Fan : कर्णधार रोहितच्या फॅन्सची बातच न्यारी; चालू सामन्यात चाहता मैदानात शिरला अन्…

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, कार्यक्रमादरम्यान अनेक महिलांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्यासोबत सेल्फीही काढल्या. सोमवारपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. यावेळी लोक दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा करतात आणि त्यांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आशिर्वाद घेतात. गरबा आणि दांडिया हे गुजरात आणि भारताच्या इतर भागांमध्ये नवरात्री दरम्यान सादर केले जाणारे लोकप्रिय नृत्य आहे. या नृत्यप्रकाराचा मनसोक्त आनंद घेताना सुप्रिया सुळे यावेळी दिसत आहे. विशेष म्हणजे इतर वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करताना अनेकदा सुप्रिया सुळे यांनी गुजरात राज्यावरदेखील निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले आहे. अगदी नजीकच्या काळात फॉक्सकॉन प्रकरल्प गुजरातला गेल्यानंतर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसने या विषयात टोकाची भुमिका घेतली होती. मात्र, भारतीय संस्कृतीचे पालन करताना राजकिय क्लेश बाजूला सारत भारताची एकसंधता दर्शवणारा हा क्षण आहे.

 

नवरात्रीच्या काळात गरबा परफॉर्मन्सचे व्हिडिओ सामान्य झाले आहेत. याआधी बुधवारी उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी मुंबईच्या प्रतिष्ठित मरीन ड्राइव्हवरून असाच एक व्हिडिओ शेअर केला होता. आनंद महिंद्रा यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये, उत्साही जमाव जल्लोष करताना तसेच गरबा आणि दांडिया करताना दिसत आहे. शिवाय न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये गरबा करताना दोन मुलींचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या इंस्टाग्राम रीलमध्ये, मुली नाचताना दिसत आहेत तर त्यांच्या सभोवतालची गर्दी नृत्याचा आनंद घेत आहे आणि त्यांचे व्हिडिओ बनवित आहे. त्यामुळे नवरात्रीसारख्या क्षणात भारत हा संस्कृतीप्रधान आणि एकसंध राष्ट्र असल्याचे यंदाही पाहायला मिळाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी