30 C
Mumbai
Friday, December 1, 2023
घरमहाराष्ट्रराज ठाकरेंचे नाव घेवून सुप्रिया सुळेंचा अजित पवारांवर निशाणा !

राज ठाकरेंचे नाव घेवून सुप्रिया सुळेंचा अजित पवारांवर निशाणा !

राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सुप्रिया सुळे सध्या दौंड आणि इंदापूरच्या दौऱ्यावर आहेत. स्थानिक गणेश मंडळांना भेटी दिल्यानंतर त्यांनी माध्यमांना विविध विषयांवर प्रतिक्रिया दिल्या. यावेळी बोलताना त्यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे विशेष कौतुक केले. यावेळी माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळेंनी “राज ठाकरेंचे शिवसेनेत मतभेद झाल्यानंतर स्वतंत्र पक्षाची स्थापना केली, परंतु शिवसेना माझीच असं कधीच म्हणाले नाहीत,” असे व्यक्तव्य केले. अजित पवार यांनी बंड करत राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या नाव आणि चिन्हावर दावा केला होता. ह्यावरून अजित पवार यांना टोला देत त्यांनी हे व्यक्तव्य केले.

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, “राज ठाकरेंचे कौतुक करावेसे वाटते. त्यांचे जेव्हा शिवसेनेत मतभेद निर्माण झाले तेव्हा त्यांनी त्यांची वेगळी चूल मांडली, त्यांनी वेगळ्या पक्षाची म्हणजेच मनसेची स्थापना केली. याबाबत राज ठाकरेंचे कौतुक करते. त्यांच्यामध्ये काही मतभेद झाले असतील. पण शिवसेना माझीच आहे असे वक्तव्य त्यांनी कधीही केले नाही.”

“हे कटकारस्थान दिल्लीतून सुरु झाले आहे. याच्या पाठीमागे अदृश्य हात आहेत. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार आणि मराठी माणसांचे घर फोडण्याचं, पक्ष फोडण्याचं काम सातत्याने होत आहे. आमचे यश भारतीय जनता पक्षाला सहन होत नाही,” त्या पुढे म्हणाल्या.

हे ही वाचा 

चंद्रशेखर बावनकुळेंना सुप्रिया सुळेंनी फटकारले; पत्रकारांबाबतच्या वक्तव्याचे पडसाद उमटले !

पंकजा मुंडे यांना केंद्राचा झटका !

अजित पवार गटांकडून ऑफर्स येत आहेत; एकनाथ खडसे यांचा दावा

नागालँड मधील राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सातही आमदार अजित पवार गटाला पाठिंबा दिल्यावरून सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारलं असता त्या म्हणाल्या, “केंद्र सरकार सरकारी यंत्रणांचा गैरवापर करत आहे. भारतीय जनता पक्ष तर महाराष्ट्राचा द्वेष करते. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी शून्यातून स्वतःचे राजकारण उभे केले आहे. या दोन्ही कुटुंबात कोणत्याही प्रकारचा वाद नव्हता. या दोन मराठी सुपुत्रांच्या विरोधात भारतीय जनता पक्ष कटकारस्थान करत आहे. मराठी माणसांनी जो पक्ष स्थापन केला तो फोडायचे काम भाजपने केले आहे. भाजपला लोकशाही नाही तर दडपशाही हवी आहे.”

नागालँडमधील राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सातही आमदारांनी अजित पवार यांच्या गटाला पाठिंबा दिला आहे. नागालँडमधील आमदार तीन दिवसीय दौऱ्यावर असून ते उद्या (मंगळवार, 26 सप्टेंबर) अजित पवार यांची भेट घेणार आहेत. यावरूनराष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने आक्रमक भूमिका घेतली असून नागालँडमध्ये शेड्युल 10 अंतर्गत आमदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी