27 C
Mumbai
Friday, December 9, 2022
घरमहाराष्ट्रSupriya Sule : आता गावागावात विचारतात ताई 50 खोक्यांचे काय झाले?, यावर...

Supriya Sule : आता गावागावात विचारतात ताई 50 खोक्यांचे काय झाले?, यावर मी म्हणते…

राज्यात 'ईडी' सरकार आल्यापासून 50 खोक्यांची चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत आहे. आम्हाला गावागावात विचारतात की, ताई 50 खोक्यांचे काय झाले? यावर मी म्हणते की...

एकीकडे माजी मंत्री आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात 50 खोक्यांवरून उफळलेला वाद विकोपाला गेला असतानाच आता राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे य़ांनी 50 खोक्यांबद्दल एक वक्तव्य केले आहे. पुण्यात सुप्रिया सुळे बोलत होत्या, यावेळी त्या म्हणाल्या, राज्यात ‘ईडी’ सरकार आल्यापासून 50 खोक्यांची चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत आहे. आम्हाला गावागावात विचारतात की, ताई 50 खोक्यांचे काय झाले? यावर मी म्हणते की, मला काय माहिती असणार 50 खोक्यांबद्दल? मागे ‘ईडी’ सरकारमधील एका मंत्र्याने 50 खोके हवे का? म्हटले होते. एखादा मंत्रीच जर अशी ऑफर देत असेल तर त्यात काही तरी सत्य असेलच ना.
यावेळी महाराष्ट्रातील उद्योग बाहेच्या राज्यात जात असल्याबद्दल देखील प्रतिक्रिया दिली, त्या म्हणाल्या, देशाचा विकास होतोय हे आमच्यासाठी महत्वाचेच आहे परंतु, मेरीटवर महाराष्ट्रात ज्या गोष्टी आल्या, त्या गुजरातेत जाण्याचे कारण काय? प्रकल्प गुजरातेत गेल्याच्या एकिकडे बातम्या सुरु असताना त्यालाच काऊंटर केले जात होते. याबाबत मंत्री वेगळेवेगळे मुद्दे बोलत असतीतल तर त्यातील सत्य काय, हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे. या राज्यातील लोकांना कामाची गरज नाही का? लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे तर सामान्य व्यक्ती म्हणून विचारत आहे. सरकारमध्ये कशाचा कशाला मेळ नाही. विषय तीन घ्या एकच विषय तीनवेळा वेगवेगळ्या पद्धतीने का सांगता, असा सवाल देखील खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी केला.
दिवाळी निमित्त मुंबईतील बसेसवर ‘मराठी दिवाळी साजरी करा’ असे लिहिलेले बॅनर झळकले होते या मुद्द्यावर देखील सुप्रिया सुळे यांनीव भाष्य केले. त्या म्हणाल्या, असे बॅनर मी मुंबईतील बसेसवर पाहिले होते. पण मी म्हणते मराठी दिवाळीचा अर्थ काय?, जाहिराती जरूर करा, सणाच्या शुभेच्छा देखील द्या पण भाषेचे विभाजन कशासाठी करता, भाषासाठी काहीतरी वेगळे करा, असा सल्ला देखील त्यांनी यावेळी सरकारला दिला, अशा पद्धतीने बॅनर झळकवणे योग्य नसल्याचे देखील खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितले.
हे सुद्धा वाचा :

 Nana Patole : फडणवीस सरकारच्या काळात इतके प्रकल्प गुजरातला गेले; नाना पटोले यांची घणाघाती टीका

संतापजनक : दगडाच्या काळजाचे अधिकारी, ऐन दिवाळीत कर्णबधिर शाळांचे पगार लटकवले

Producer Kamal Kishore : पत्नीला कारने धडक दिल्याच्या प्रकरणात निर्माते कमल किशोर यांना अटक; आज न्यायालयात होणार सुनावणी
राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे, शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर देखील सुप्रिया सुळे यांनी यावेळी भाष्य केले त्या म्हणाल्या शेतकऱ्यांना सरकारकडून अद्यापही मदत पोहचलेली नाही, राज्यातील किती महत्त्वाचे नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थिती पाहिली असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला. दिवाळीत देखील सरकारक़डून शेतकऱ्यांना मदत झाली नाही, एखाद्यावेळी एखादा निर्णय झाला तर ठिक, पण सातत्त्याने तेच निर्णय पुन्हा पुन्हा होत असतील तर मात्र मनात शंकेची पाल चुकचुकते अशी प्रतिक्रिया यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!