24 C
Mumbai
Saturday, December 2, 2023
घरमहाराष्ट्रसुप्रिया सुळे, वर्षा गायकवाड धावल्या सुषमा अंधारेंच्या मदतीला! फडणवीसांकडे केली 'ही' मागणी

सुप्रिया सुळे, वर्षा गायकवाड धावल्या सुषमा अंधारेंच्या मदतीला! फडणवीसांकडे केली ‘ही’ मागणी

नाशिक ड्रग्स रॅकेट प्रकरणातील आरोपी ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना उबठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी याबाबत आक्रमक पवित्रा घेऊन ह्या राकेच्या मुळाशी जाऊन संबंधित लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांच्यावरील राजकीय दबाव आणि धमक्यांबद्दल सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली होती. आता सुप्रिया सुळे आणि वर्षा गायकवाड यांनी सुषमा अंधारे यांना पाठिंबा दर्शवला आहे.

नाशिक ड्रग्स रॅकेट प्रकरणातील आरोपी ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी बुधवारी, (18 ऑक्टोबर) बंगळुरूमधून अटक केली. त्यानंतर, ललित पाटीलच्या अटकेनंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना ‘आता बोलणाऱ्यांची तोंड बंद होतील,’ असा इशारा दिला होता. यावर सुषमा अंधारे यांनी गुरुवारी (19 ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली होती. सुषमा अंधारे यांनी यावेळी “तोंड बंद कराल म्हणजे आम्हाला संपवुन टाकाल का?” असा सवाल फडणवीसांना केला होता.


फडणविसांच्या व्यक्तव्यावर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, “देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की, बोलणाऱ्यांची तोंडं बंद होतील. हा इशारा आहे की धमकी आहे? तोंडं बंद कराल म्हणजे काय कराल? संपवून टाकाल का? की मलिक, देशमुख आणि राऊतांना अडकवलं तसं मला अडकवाल? अडकवाल तर कशात अडकवाल? मी आयुष्यभर संवैधानिक भाषा सांगत आली आहे. आयुष्यभर कायदे आणि कलमं याशिवाय काहीही बोललेले नाही. तुम्ही मला अडकवलं तर कशात अडकवाल?”

“देवेंद्र फडणवीस हे विसरत आहेत की, ते एका पक्षाचे नेते नसून ते या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहेत. या राज्यातील प्रत्येक नागरिकाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देणं हे त्यांचं कर्तव्य आहे. त्यांचं आणि माझं काही शत्रुत्व आहे असं त्यांना का वाटत आहे?” असा सवाल सुषमा अंधारेंनी केला.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून सुषमा अंधारे यांना पाठिंबा दर्शवला. त्या म्हणाल्या, “सुषमा अंधारे या ड्रग्जच्या विरोधात ठामपणे उभ्या आहेत. त्यांना धमक्या देण्यात येत आहेत. त्या ड्रग्जविरोधात लढू पाहत असताना सत्तेतील काही घटक त्यांना घाबरविण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे. येथे महिलांना धमक्या देणाऱ्यांची गय केली जात नाही. स्वतः गृहमंत्र्यांनी या प्रकरणी हस्तक्षेप करायला पाहिजे. महिलांना धमक्या देणारे तातडीने गजाआड होणे गरजेचे आहे.”


या पोस्टमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनाही टॅग केले आहे. सुषमा अंधारे यांनीही सुप्रिया सुळेंची पोस्ट शेयर करत म्हणाल्या, “खूप खूप आभार… आपण जिजाऊ-सावित्रीच्या-रमाईच्या लेकी या महाराष्ट्राच्या उज्वल भवितव्यासाठी लढत राहू..!”

हे ही वाचा 

‘आत्महत्या करू नका’, मराठा आंदोलकाच्या आत्महत्येवर नाना पटोलेंचे आवाहन

‘आम्हाला संपवुन टाकाल का?’ फडणविसांच्या टीकेवर सुषमा अंधारेंचा सवाल

जोकर त्रास देणार्‍यांचे समर्थन करतात, तेव्हा हिटलर,आता नेतान्याहू….असे का म्हणाले आव्हाड?

वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया

कॉँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांनीही सुषमा अंधारे यांना पाठिंबा दर्शवला आहे. त्या म्हणाल्या, “सुषमाताई अंधारे यांनी समाजघातकी ड्रग्ज माफियांविरोधात, तस्करी विरोधात, त्यांना पाठिंबा देणाऱ्यांविरोधात उठवलेला आवाज दाबण्याचा केविलवाणा प्रयत्न सत्तेत बसलेल्या काहींकडून होताना दिसत आहेत. सुषमाताईंना धमक्या देण्यात येत आहेत. गुन्हेगारीविरुद्ध ठामपणे भूमिका मांडणाऱ्या एका निडर महिला नेत्याला असे लक्ष्य करणे हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे नाही.’


“या सरकारमध्ये थोडीशी नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी सत्य बोलणाऱ्यांना धमकावण्याऐवजी या प्रकरणाच्या खोलाशी जाऊन यात ज्यांचे ज्यांचे लागेसंबंध असतील त्यांना गजाआड केले पाहिजे. शेवटी या महाराष्ट्राच्या भविष्याचा प्रश्न आहे,” त्या म्हणाल्या.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी