31 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्र'माता रमाई जयंती उत्सव' शासकीय पातळीवर साजरा करा; सुप्रिया सुळे यांची एकनाथ...

‘माता रमाई जयंती उत्सव’ शासकीय पातळीवर साजरा करा; सुप्रिया सुळे यांची एकनाथ शिंदेंकडे मागणी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांना खंबीरपणे साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी माता रमाई (Mata Ramai) यांची 7 फेब्रुवारी रोजी जयंती असते, यंदा माता रमाई यांची ११५ वी जयंती असून त्यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात ‘माता रमाई जयंती उत्सव’ (Mata Ramai Jayanti Utsav)शासकीय पातळीवर साजरी करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे एका पत्राव्दारे केली आहे. (Supriya Sule’s demand to Eknath Shinde; Celebrate ‘Mata Ramai Jayanti Utsav’ at Government level )

सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी माता रमाई यांची १२५ वी जयंती दि. ७ फेब्रुवारी, २०२३ रोजी येत आहे. माता रमाई व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे १९०६ मध्ये भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये विवाहबद्ध झाले. तेव्हापासून त्यांनी भारतरत्न बाबासाहेबांना शेवटपर्यंत साथ दिली. माता रमाई एक साध्या व कर्तव्यदक्ष स्त्री होत्या.
डॉ. बाबासाहेबांच्या अनेक सामाजिक चळवळी आणि सत्याग्रहांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्यामुळे डॉ. बाबासाहेबाच्या चळवळीत महिला मोठ्या प्रमाणात सहभागी व्हायच्या. माता रमाई यांनी समाजासाठी केलेला त्याग हा मोठा असून तो सर्वसामान्य जनतेपर्यंत व नविन पिढीला मार्गदशक ठरण्याकरिता प्रबोधन, लोकशिक्षणाच्या हेतूने यावर्षीची त्यांची जयंती ही मोठ्या प्रमाणात साजरी करण्याकरिता राज्य शासनाने निर्णय घ्यावा अशी आपणास विनंती आहे. तसेच शासनाच्या वतीने संपूर्ण वर्षभरात महामानवांना अभिवादन करण्यासाठी प्रकाशित केल्या जाणाऱ्या यादीमध्ये त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती दरवर्षी साजरी करण्याबाबत कायमस्वरूपी समावेश करण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी या पत्राव्दारे केली आहे.

हे सुद्धा वाचा

आमदार झाल्यानंतर सत्यजित तांबेंची पहिलीच पत्रकार परिषद; नाना पटोले, एच.के. पाटलांवर डागली तोफ

साहित्य संमेलनात पुस्तकविक्रेत्यांची भोवनीदेखील होईना; हजारो रुपये भाडे घेऊन स्टॉलधारकांना आयोजकांनी सोडले वाऱ्यावर!

HAL Helicopter: आशियातील सर्वात मोठी हेलिकॉप्टर कंपनी सज्ज; मोदींच्या हस्ते सोमवारी होणार उद्घाटन 

खासदार सुप्रिया सुळे यांनी याबबत ट्विटदेखील केले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जडणघडणीत यांच्या पत्नी त्यागमूर्ती माता रमाई यांचाही खुप मोठा वाटा आहे. त्यांच्याप्रती समाजामध्ये खुप आदर व आपुलकी आहे. माता रमाई यांची सात फेब्रुवारी रोजी जयंती असते.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी हा दिवस अतिशय उत्साहात साजरा करुन माता रमाई यांचे स्मरण करतात. माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना नम्र विनंती आहे की कृपया या वर्षीपासून माता रमाई यांची 7 फेब्रुवारी रोजी येणारी जयंती शासकीय स्तरावरुन साजरी करण्याचे निर्देश आपण यंत्रणेला द्यावेत. धन्यवाद.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी