22 C
Mumbai
Saturday, December 10, 2022
घरमहाराष्ट्रSushma Andhare : सुषमा अंधारेंनी सांगितले कधी कोसळणार शिंदे-फडणवीस सरकार!

Sushma Andhare : सुषमा अंधारेंनी सांगितले कधी कोसळणार शिंदे-फडणवीस सरकार!

गेल्या काही दिवसांपासून शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार, मध्यावधी निवडणूका लागणार अशी वक्तव्ये राजकीय गोटात केली जात आहेत, आता शिंदे फडणवीस सरकार कधी पर्यंत कोसळेल हेच शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाकित केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार, मध्यावधी निवडणूका लागणार अशी वक्तव्ये राजकीय गोटात केली जात आहेत, आता शिंदे फडणवीस सरकार कधी पर्यंत कोसळेल हेच शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाकित केले आहे, येत्या पाच सहा महिन्यांमध्ये शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल असा दावा अंधारे यांनी केला आहे. शिवसेना ठाकरे गटाची सध्या राज्यभरात महाप्रबोधन यात्रा सुरू आहे, या यात्रेचे नेतृत्त्व सुषमा अंधारे करत आहेत. त्यांच्या सभांना देखील मोठा प्रतिसाद मिळत आहे. काल कोल्हापूरातील सभेत बोलताना शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. शिवसेनेतून फुटुन गेलेल्या आमदारांवर देखील यावेळी त्यांनी निशाणा साधला. तसेच भाजपवर देखील त्यांनी या सभेत टीका केली.

भाजपमध्ये आयारामांना मानाचे स्थान दिले जात आहे. मात्र पक्षातील निष्ठावंतांना मात्र डावललेले जात असल्याचा आरोप यावेळी सुषमा अंधारे यांनी केला. पंकजा मुंडे यांना देखील पक्षात जाणिवपूर्वक डावलले जात असल्याचा आरोप यावेळी सुषमा अंधारे यांनी केला. यावेळी शिवसेनेतून फुटून गेलेल्या आमदारांवर देखील त्यांनी निशाणा साधला. शिंदे गटातील आमदारांमध्ये सुरू असलेल्या धुसफुशीवर देखील त्यांनी यावेळी भाष्य केले. शिंदे गटात असलेले आणि राज्याचे मंत्री दादा भुसे आणि आमदार सुहास कांदे यांच्यातील नाराजी नाट्यावर बोलताना त्या म्हणाल्या, ज्या आमदारांना सरकारमधील मंत्रीच विश्वासात घेत नसतील, पक्षपात करत असतील तर एममेकांबद्दल नाराजी वाढणारचं.
हे सुद्धा वाचा:

Vinayak Mete Accident Case: सीआयडीकडून विनायक मेटे अपघात प्रकरणी चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा

Measles Outbreak in Mumbai : मुलांचे आरोग्य जपा; मुंबईत गोवरचा उद्रेक

Sachi Vaze : बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेच्या जामीनावर शुक्रवारी फैसला
यावेळी त्यांनी आमदार रवी राणा आणि माजी मंत्री आमदार बच्चु कडू यांच्या वादावर देखील टीपण्णी केली. सुषमा अंधारे म्हणाल्या, आमदार रवी राणा यांच्याकडून बच्चू कडू यांना डॅमेज करण्याचा प्रयत्न जाणिवपूर्वक केला जात आहे. तसेच आता खोक्यांवरून टीका केल्यास केस दाखल केली जाईल असे नुकतेच शिंदे गटाकडून म्हटले होते, त्यावर बोलताना अंधारे म्हणाल्या खो्क्यांवरून केस करायचीच असेल तर ती पहिल्यांदा रवी राणा यांच्यावर करावी लागेल.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!