29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रसुषमा अंधारे यांचा रूपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप

सुषमा अंधारे यांचा रूपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप

राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी माझ्याबाबत वापरलेल्या आक्षेपार्ह भाषेबाबत मी रुपाली चाकणकर यांना दोन वेळा फोन केला मात्र त्यांनी फोनच उचलला नाही सुषमा अंधारे यांनी केला आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी माझ्याबाबत वापरलेल्या आक्षेपार्ह भाषेबाबत मी रुपाली चाकणकर यांना दोन वेळा फोन केला मात्र त्यांनी फोनच उचलला नाही, असे सुषमा अंधारे म्हणाल्या. तसेच कृषी मंत्री इब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत महिला आयोगाने जशी तात्काळ दखल घेतली तशी गुलाबराव पाटील यांच्याबाबत का घेतली नाही, असा सवाल देखील त्यांनी केला आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, राज्य महिला आयोगाने सिलेक्टिव्ह वागू नये, जर अब्दुल सत्तार यांना आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल नोटीस पाठविली जात असेल तर गुलाबराव पाटील यांना देखील नोटीस पाठवावी, कारण दोघेही गुन्हेगारच आहेत. मी राज्य महिला आयोगाच्या लक्षात आणून देऊ इच्छिते की, त्यांनी गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याबाबत दखल घेऊन कारवाई करावी, मी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना यासंदर्भात दोनवेळा फोन केला पण त्यांनी फोन उचलला नाही. मी महिला आयोगावर टीका करत नाही, पण त्यांनी गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याची दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे.
हे सुद्धा वाचा :
Bharat Jodo Yatra in Maharashtra: भारत जोडो यात्रेत आदित्य ठाकरे होणार सहभागी
Mahesh Manjarekar : ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाच्या निषेधार्थ नेसरी येथे निषेध मोर्चा
Abhijeet Deshpande : ‘केलेल्या कृत्यासाठी महाराजांची माफी मागा!’ अभिजित देशापांडेंचा जितेंद्र आव्हाडांना इशारा
काय आहे प्रकरण ?
पाणीपुवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यामुळे गुलाबराव पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने जळगावात मोर्चा काढत आंदोलन केले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी