28 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रसत्ताधारी आमदार, खासदारांच्या घरासमोर फेकणार कांदा; स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

सत्ताधारी आमदार, खासदारांच्या घरासमोर फेकणार कांदा; स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

राज्यात कांद्याचे भाव पडल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. किलोला ५ ते ८ रुपयांपर्यंत दर सध्या कांद्याला मिळत आहेत. त्यामुळे कांद्याच्या लागवडीसाठी केलेला खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी कांदा अक्षरश: रस्त्यावर फेकुन देत आहेत. विरोधी पक्षांनी विधिंडळात कांदा दरावरुन आवाज उठवला आहे. त्यातच आता स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील आक्रमक झाली आहे. सत्ताधारी पक्षाने कांदा दराबाबत योग्य तोडगा न काढल्यामुळे आता सत्ताधारी आमदार, खासदारांच्या घरासमोर कांदा फेकून स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी सांगितले. (Swabhimani Setakari Sanghatana aggressive; The ruling MLA will throw onion in front of MP’s house)

सध्या कांद्याचे दर मोठयाप्रमाणात घसरल्यामुळे शेतकऱ्यांनी अत्यंत तुटपुंज्या दराने कांदा विकावा लागत आहे. अनेक शेतकऱ्यांनी तर अक्षरशं: रस्त्यावर कांदा फेकुन दिला आहे. राज्यात कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कांदा लागवडीसाठी केलेला खर्च देखील निघत नसल्यामुळे शेतकरीवर्गात संतापाची लाट पसरली आहे. शासनाने कांदा पिकासाठी किमान हमीभाव द्यावा, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी करत आहेत.

हे सुद्धा वाचा 

भारत मॅट्रिमोनिअलविरोधात सोशल मीडियावर बॉयक़ॉटचा ट्रेंड; वाचा काय आहे कारण

सावधान, देशात पुन्हा एक नवीन व्हायरस; काळजी न घेतल्यास होऊ शकतो मृत्यू!

Photo : सनी लिओनीने लुटला होळीचा आनंद; सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत दिल्या शुभेच्छा 

यंदा राज्यात पाऊसकाळ चांगला झाल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली होती. कांदा पिकातून काही पैसे गाठीशी येतील या भावनेतून शेतकरी कांदा पिकाची लागवड करुन त्या आशेवर होता. मात्र कांद्याचे दर पडल्यामुळे कवडीमोल भावाने कांदा विकावा लागत असल्याने शेतकऱ्यांचे स्वप्न मातीमोल झाले आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून या आठवड्यात सत्ताधारी पक्षातील आमदार खासदारांच्या घरासमोर कांदा फेकून आंदोलन करणाऱ असल्याचे पवार यांनी सांगितले आहे.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी