राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानंतर सत्तार यांच्याविरोधात राज्यभरात तीव्र आंदोलन करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील अब्दुल सत्तार यांना माफी मागण्याचे आदेश दिले. सत्तार यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी देखील अनेक नेत्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे. दरम्यान राज्य महिला आयोगाने कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याची दखल घेत या प्रकरणी राज्याच्या पोलीस महासंचालकांना कायदेशीर कारवाई करावी आणि त्याचा अहवाल सादर करावा अशी सुचना देण्यात आली आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी हे पत्र पोलीस महासंचालकांना पाठविले असून याबाबत त्यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ”राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत अपमानास्पद उद्गार काढल्याची तक्रार राज्य महिला आयोगाकडे प्राप्त झाली आहे. महिलांनी अपमानास्पद वागणूक देत, आक्षेपार्ह विधाने करत त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचविणे, कमी लेखणे, कर्तृत्त्वहनन करणाऱ्या अशा वक्तव्याची आगोगाने दखल घेतली आहे, याप्रकरणी राज्याच्या पोलीस महासंचालकांनी त्याचा अहवाल तात्काळ सादर करावा, अशी आयोगाकडून सुचना देण्यात आली आहे.”या ट्विटसोबत त्यांनी पोलीस महासंचालकांना लिहिलेले पत्र देखील पोस्ट केले आहे.
कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्याविरोधात राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे, राष्ट्रवादीने त्यांच्या घरासमोर आंदोलन देखील केले. तसेच सत्तार यांच्या विरोधात मुंबईतील फोर्ट येथील माता रमाबाई पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. याबाबत पुरावा म्हणून आम्ही पेनड्राईव्ह पोलिसांना दिल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी सांगितले. आता माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाणे आपल्या नावाला जागेल आणि कारवाई करेल अशी अपेक्षा आहे, असे तपासे म्हणाले.
राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत अपमानास्पद उद्घार काढल्याची तक्रार राज्य महिला आयोगाकडे प्राप्त झाली आहे. महिलांना अपमानास्पद वागणूक देत, आक्षेपार्ह विधाने करत त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणे, कमी लेखणे, कर्तुत्वहनन१/२ pic.twitter.com/lOXsuK2VIz
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) November 7, 2022
काय म्हणाले कृषी मंत्री अब्दुल सत्तार ?
औरंगाबादच्या सिल्लोड येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. यासाठी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून आढावा घेतला जात आहे. यावेळी कृषी मंत्री सत्तार यांच्याशी वृत्तवाहिन्यांनी संवाद साधत असताना त्यांना 50 खोक्या संदर्भात सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेबद्दल प्रश्न विचारला असता कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले ”इतकी भिकार*** झाली असेल सुप्रिया सुळे तर तिला ही देऊ” असे विधान केले.