34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रबनावट कामगार नेत्यांचे कंबरडे मोडा; देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश

बनावट कामगार नेत्यांचे कंबरडे मोडा; देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश

महाविकास सरकारच्या काळात राज्यात कंत्राटांसाठी उद्योजकांना धमकवण्याचे प्रकार वाढीस लागले होते, त्यामुळे उद्योजकांनी गुंतवणुकीस परराज्यांना पसंती दिल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राज्यात पुन्हा उद्योगस्नेही वातावरण तयार करण्यास आमचे सरकार कटिबद्ध असल्याचे सांगत बोगस नेत्यांचे कंबरडे मोडून काढा, असा कडक आदेश फडणवीस यांनी पोलिसांना दिला आहे.

महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असताना राज्यात गुंतवणूक करण्यास इच्छूक असलेल्या उद्योजकांना स्वार्थासाठी धमकावण्याचे प्रकार वाढीस लागले होते. त्यामुळेच कित्येक उद्योजकांनी महाराष्ट्राबाहेर गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिल्याचे सूचित करत अशा बोगस नेत्यांचे कंबरडे मोडून काढण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी पोलिसांना दिले आहेत. आजही पुण्यासह राज्यात गुंतवणूक करण्यास अनेक उद्योजक उत्सुक आहेत. मात्र, माथाडी कामगारांचे काही बनावट नेते तयार झाले असून ते कंत्राटासाठी उद्यजकांना त्रास देत असतात. अशा बोगस नेत्यांचे कंबरडे मोडून काढण्याचे स्पष्ट आदेश आमच्या सरकारने दिले असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पुण्यातील (Pune) एका कार्यक्रमात सांगितले. (Take strict action against fake leaders; Devendra Fadnavis orders the police)
पुण्यातील पाषाण रस्त्यावरील पोलीस संशोधन केंद्रात शनिवारी वार्षिक गुन्हेगारी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना हे आदेश दिले. राज्यात महाविकास सरकारच्या काळात उद्यजकांना गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण नसल्याचे सांगत त्याबाबतचा एक किस्सा त्यांनी सांगितला. ते म्हणाले,” वर्षभरापूर्वी एक उद्योजक राज्यात सहा हजार कोटींची गुंतवणूक घेऊन येणार होता. मात्र, एका मंत्र्यांमार्फत कंत्राट मिळवण्यासाठी त्या उद्योजकाला धमकावण्यात आले. राज्यातील दहशतीचे वातावरण पाहून अखेर त्या उद्योजकाने महाराष्ट्रात गुंतवणूक न करता कर्नाटकमध्ये सहा हजार कोटींची गुंतवणूक केली.”

हे सुद्धा वाचा

VIDEO : सत्यजित तांबेनी काँग्रेसला फसविले : नरेंद्र वाबळे, अध्यक्ष, मुंबई मराठी पत्रकार संघ

कामाची बातमी : घरमालकांना मोठा दिलासा अन् भाडेकरूंची कटकटीतून मुक्तता

महाराष्ट्रात ३०० कोटींची गुंतवणूक होणार; मंत्री उदय सामंत यांचा जर्मनी दौरा यशस्वी

राज्यात कंत्राट मिळवण्यासाठी उद्योजकांना छळण्याचे काम सुरु होते. त्यामुळेच उद्योजकांनी महाराष्ट्राबाहेर गुंतवणुकीस पसंती दिल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. मात्र, यापुढे अशा बोगस लोकांची गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. उद्योजकांना त्रास देणारा कोणत्याही पक्षाचा, गटाचा, जातीचा किंवा धर्माचा असो, त्याची गय केली जाणार नाही.

… अन्यथा पोलिसांवरही कारवाई
राज्यातील उद्योजकांना कंत्राटासाठी धमकावणाऱ्या बोगस नेत्यांवर पोलिसांनी कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. पण अशा लोकांवर पोलिसांनी कारवाई न केल्यास पोलिसांवरही कारवाई करण्यात येईल, असा कडक इशारा त्यांनी पोलिसांनाही यावेळी दिला आहे.

उद्योगस्नेही वातावरणासाठी सरकार जबाबदार
राज्यात उद्योगांना पोषक असे वातावरण तयार करणे ही सरकारची जबाबदारी असते. त्यासाठी उद्योगात राजकारण आणू नका, असे फडणवीस यावेळी म्हणाले. मुंबईनंतर पुण्याला दुसऱ्या विकास केंद्राचा दर्जा मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही फडणवीस यांनी दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी