32 C
Mumbai
Friday, September 2, 2022
घरमहाराष्ट्रTET Scam : टीईटी घोटाळ्यातील अपात्र शिक्षकांचे पगार झाले बंद

TET Scam : टीईटी घोटाळ्यातील अपात्र शिक्षकांचे पगार झाले बंद

महाराष्ट्रात झालेल्या शिक्षक भरती घोटाळ्यात अर्थात टीईटी घोटाळ्यामध्ये अपात्र ठरलेल्या शिक्षकांचे वेतन हे ऑगस्ट महिन्यापासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षण संचालक कार्यालयाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्रात झालेल्या शिक्षक भरती घोटाळ्यात अर्थात टीईटी घोटाळ्यामध्ये (TET Scam) अपात्र ठरलेल्या शिक्षकांचे वेतन हे ऑगस्ट महिन्यापासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षण संचालक कार्यालयाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या या टीईटी परीक्षेमध्ये सात हजार ८७४ उमेदवारांनी गैरप्रकारे परीक्षा उत्तीर्ण केल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये शिंदे-भाजप सरकारचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलींची नावे समोर आल्याने आणखीनच गोंधळ उडाला. परिणामी, अपात्र असलेल्या शिक्षकांचे वेतन आता बंद करण्यात आल्याने अपात्र शिक्षकांवर कारवाईचा बडगा उभारण्यात आल्याचे बोलले जात आहे. या घोटाळ्यामध्ये प्राथमिक शाळेचे ५७६ आणि माध्यमिक शाळेचे ४४७ शिक्षक अपात्र ठरलेले आहेत.

शिक्षण संचालक कार्यालयाकडून अपात्र शिक्षकांचे आयडी गोठवण्याचा निर्णय सुद्धा शिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. टीईटी घोटाळ्यामधील अपात्र शिक्षकांची माहिती समोर आल्यानंतर देखील या घोटाळ्यामध्ये नाव असलेले शिक्षक हे शालार्थ प्रणालीद्वारे वेतन घेतच होते. ज्यामुळे आता शिक्षण संचालक कार्यलयाकडून या अपात्र शिक्षकांवर कारवाई करत त्यांचे वेतन ऑगस्ट महिन्यापासून बदन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

दरम्यान, या घोटाळ्यात अपात्र ठरलेले शिक्षक नगरपालिका, महानगरपालिका, नगरपरिषद, खाजगी अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमध्ये सह शिक्षक आणि शिक्षण सेवक पदांवर अद्यापही कार्यरत असल्याचे समोर आले आहे. ज्यामुळे आता या घोटाळ्यातील अपात्र शिक्षक हे ऑगस्ट महिन्यापासूनच्या वेतन प्रणालीमधून वगळण्यात आले आहेत.

हे सुद्धा वाचा

Abdul Sattar : शिक्षक भरती घोटाळ्याचे धागेदोर अब्दुल सत्तार यांच्यापर्यंत !

MPSC मार्फत शिक्षक भरती घेण्याचा शिक्षण आयुक्तालयाने शासनाला दिला प्रस्ताव

Eknath Shinde cabinet Expansion : वादग्रस्त अब्दुल सत्तार, संजय राठोड यांनाही मिळाली मंत्रीपदाची खूर्ची

शिक्षक भरती प्रक्रियेतील हा सर्वात मोठा घोटाळा असून पुणे सायबर पोलिसांकडून हा घोटाळा उघड करण्यातून आला होता. २०१९ मध्ये घेण्यात आलेली शिक्षक भरतीची टीईटी परीक्षा ही उत्तीर्ण करण्यासाठी तब्ब्ल सात हजार ८८० उमेदवारांकडून लाखोंच्या घरात रक्कम घेण्यात आली होती, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. सदर घोटाळा हा पुणे सायबर पोलिसांकडून उघडकीस आणण्यात आला. यामध्ये टीईटी परीक्षेला बसलेले ७८०० विद्यार्थी हे अपात्र असल्याची माहिती पुणे सायबर पोलिसांकडून करण्यात आलेल्या तपासात उघड झाली. तसेच आता या घोटाळ्यातील अपात्र ठरलेल्या ७८०० बोगस शिक्षकांच्या नावाची यादी ही प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षण अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येणार आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी