22 C
Mumbai
Saturday, December 10, 2022
घरमहाराष्ट्रThane News : मुख्यंमंत्र्यांच्या ठाण्यात दिवाळीला ग्रहण! एकाच दिवसांत फटाक्यांमुळे 11 ठिकाणी...

Thane News : मुख्यंमंत्र्यांच्या ठाण्यात दिवाळीला ग्रहण! एकाच दिवसांत फटाक्यांमुळे 11 ठिकाणी आग

महाराष्ट्रातील ठाण्यात दिवाळीनिमित्त फटाक्यांमुळे 11 ठिकाणी आग लागली. महापालिकेने सांगितले की, ठाणे अग्निशमन दलाला आगीच्या घटनांबाबत एकूण 16 दूरध्वनी आले, त्यापैकी 11 ठिकाणी फटाक्यांमुळे आग लागली.

सध्या संपूर्ण देशात दिवाळीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. सोमवारी (24 ऑक्टोबर) सर्वत्र दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा मानला जाणारा लक्ष्मीपूजनचा दिवस साजरा केला गेला. यावेळी प्रत्येक ठिकाणी दिव्यांनी विद्युत रोषनाई करत फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली. मात्र, महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात यावेळी दिवाळीला ग्रहण लागल्याचे दिसून आले. सोमवारी 24 ऑक्टोबर रोजी देशभरात दिवाळी मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली, सर्वत्र आनंदाचे वातावरण होते, मात्र यादरम्यान काही ठिकाणी आगीच्या घटनाही घडल्या. महाराष्ट्रातील ठाण्यात दिवाळीनिमित्त फटाक्यांमुळे 11 ठिकाणी आग लागली. ठाणे महापालिकेने ही माहिती दिली. महापालिकेने सांगितले की, ठाणे अग्निशमन दलाला सोमवारी आगीच्या घटनांबाबत एकूण 16 दूरध्वनी आले, त्यापैकी 11 ठिकाणी फटाक्यांमुळे आग लागली. मात्र या आगीच्या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

पालघर जिल्ह्यातील वसई परिसरात सोमवारी रात्री चपला गोदामाला आग लागली, माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग आटोक्यात आणली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे अग्निशमन विभागाने सांगितले. याशिवाय देशाच्या विविध भागांतून फटाक्यांमुळे पेट घेतल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

High Court News : अपघातात अपंगत्व आलेल्या व्यक्तींसाठी मुंबई उच्च न्यायालयाने घेतला महत्वाचा निर्णय

Digital Media : डिजिटल मीडिया संपादक, पत्रकार संघटनेचे शनिवारी राज्यस्तरीय अधिवेशन; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन

Arvind Kejriwal : केजरीवाल म्हणतात दिल्ली सर्वाधिक प्रदुषित शहरांपैकी नाही!

आंध्र प्रदेशात फटाक्याच्या दुकानाला आग, दोघांचा मृत्यू
आंध्र प्रदेशातील चित्तूर येथे दोन दिवसांपूर्वी फटाक्यांच्या दुकानात भीषण आग लागली होती. आगीने हळूहळू संपूर्ण दुकानाला वेढा घातला आणि आजूबाजूच्या अनेक दुकानांनाही आग लागली. आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे रविवारी पहाटे एका फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग लागली. या आगीत दोघांचा मृत्यू झाला. आग लागलेल्या तीन दुकानांपैकी एका दुकानात कामगार झोपले होते, असे पोलिसांनी सांगितले.

एका मिनिटात 15 लाख फटाके फोडले
अशीच एक घटना राजस्थानच्या अजमेर शहरातून समोर आली आहे. अजमेर शहरालगतच्या ग्रामीण भागातील एका फटाक्यांच्या दुकानाला रात्री उशिरा भीषण आग लागली. या भीषण आगीत दुकानात असलेले पंधरा लाख रुपये किमतीचे फटाके काही मिनिटांत धुराचे झाले. ही घटना अजमेर जिल्ह्यातील मसूद शहराजवळील बेगलियावास गावातील आहे.

दरम्यान, भारतात वाढलेले वायू प्रदुषण लक्षात घेता दिवाळीच्या पार्ष्वभूमीवर अनेक ठिकाणी फटाक्यांवर बंदी घालण्यात आली होती. विशेष म्हणजे देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीत सर्व ठिकाणी तर मध्ये प्रदेशातील काही जिल्ह्यांत फटाकेबंदी जाहीर करण्यात आली होती. मात्र, इतर ठिकाणीू दिवाळी आणि रविवारी (23 ऑक्टोबर) सुरू असलेल्या टी20 विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्यांत भारताने मिळवलेल्या विजयामुळे द्विगुणित आनंद साजरा करण्यात आला.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!