31 C
Mumbai
Saturday, September 3, 2022
घरमहाराष्ट्रDevendra Fadnavis : संभाजी ब्रिगेडसोबत केलेली युती म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी- देवेंद्र...

Devendra Fadnavis : संभाजी ब्रिगेडसोबत केलेली युती म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी- देवेंद्र फडणवीस

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. त्यामुळे शिवसेनेने संभाजी ब्रिगेडसोबत युती केली आहे. यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे.

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. त्यामुळे शिवसेनेने संभाजी ब्रिगेडसोबत युती केली आहे. यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. शिवसेनेने संभाजी ब्रिगेडसोबत केलेली युती म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी आहे अशी प्रतिक्रीया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे श‍िवसनेमध्ये उभी फूट पडली असून, शिवसेनेला गळती लागली. शिवसनेमधील आमदारांनंतर, खासदार, विभाग प्रमुख, शहरप्रमुख, कार्याकर्त्यांनी भाजपची वाट धरली आहे. जो पक्ष बलाढय असतो. त्याच्याकडे सगळे जण आपोआप आकर्षीत होत असतात.

आता महाराष्ट्रामध्ये भाजप हा पक्ष बलाढय होत चालला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्य ‘काटे की टक्कर’ होणार आहे हे न‍िश्चित आहे. शिवसेना कोणाची ? उद्धव ठाकरेंची की, एकनाथ शिंदेची हा प्रश्न अजून प्रलंबित आहे. त्याचा निकाल कधी लागतो याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे शिवसेना वाढवण्यासाठी जीवाचे रान करत राज्यभर दौरे करत आहेत. मराठी जनतेला साद घालत आहेत. त्यामुळे त्यांच्या हाकेला कसा प्रतिसाद मिळतो हे येणारा काळच ठरवेल. दुसरे असे की, शिवसेनेचा खंबीर सेनापती अशी ओळख असलेले संजय राऊत हे पत्राचाळ घोटाळा प्रकरणी जेलमध्ये आहेत.

त्यामुळे शिवसेनेचा आवाज कमी झाला आहे. हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच मोठे आण‍ि निष्ठावान नेते शिवसेनेमध्ये आहेत. त्यांना देखील तपास यंत्रणांच्या कचाटया अडकवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. आम्ही कधीही हार मानणार नाही हा शिवसेनेचा बाणा आहे. परंतु या वेळची परिस्थिती ही अत्यंत वेगळी आहे. विपरीत आहे. त्यामुळेच शिवसेनेने संभाजी ब्रिगेड सोबत युती केली आहे. पुढे येणाऱ्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी आहे की, नाही यावर देखील प्रश्न निर्माण झाले आहेत. तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्ष संभाजी ब्रिगेड बरोबरच्या युतीला पाठिंबा देतील का ? हा देखील प्रश्न निमित्ताने निर्माण झाला आहे.

हे सुद्धा वाचा

अष्टविनायक दर्शन : पाचवा गणपती भक्तांचे विघ्न हरण करणारा ओझरचा ‘विघ्नेश्वर’

Eknath Shinde : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गाडयांना टोलमाफी, शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय

International ‘Dog’ Day : इंटरनॅशनल ‘डॉग’ डे म्हणजे कुत्र्यांच्या प्रामाण‍िक पणाचा गौरव

कारण इतका मोठा धक्का बसल्या महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेने सोबत राहिल का ? या बाबतही शंका आहे. शिवसेना नेमकी कोणाची हा पेच दसऱ्याच्या आधी सुटला तर, शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा कोण करेल ते सर्वांनाच समजेल. तोपर्यंत मात्र सर्वांनची उत्सुकता अशीच ताणली जाणार आहे. यावर देखील देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रीया द‍िली आहे. जे नियमात आहे तेच होईल, नियमांच्या बाहेर या सरकारमध्ये काहीच होणार नाही. असेही फडणवीस बाेलले.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी