27 C
Mumbai
Wednesday, February 1, 2023
घरमहाराष्ट्रVIDEO: 'फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ पुस्तकाला मिळालेल्या पुरस्काराची चौकशी होणार

VIDEO: ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ पुस्तकाला मिळालेल्या पुरस्काराची चौकशी होणार

"फ्रॅक्चर्ड फ्रीडम" पुस्तकाला 2021 या वर्षाच्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण राज्य वाग्मय पुरस्काराअंतर्गत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार देण्यात आला आहे.

सन 2021 साठी स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांतर्गत प्रौढ वाङ्मय अनुवादित प्रकारातील तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम तुरुंगातील आठवणी व चिंतन’ या पुस्तकाला देण्यात आला आहे. या पुस्तकाच्या निवडीसंदर्भात तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षांनी कुठलीही चर्चा केली नाही अथवा ही बाब निदर्शनास आणून दिली नाही. त्यामुळे या सर्वच प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.

साहित्यामध्ये लेखनाचे स्वातंत्र्य असते. परंतु ज्यावर बंदी आहे, ते लिहिता येत नाही. बंदी घालण्याची एक वेगळी प्रक्रिया असते. ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या पुस्तकावर बंदी नसली तरी राज्यात नक्षलवादाचे उदात्तीकरण होऊ शकत नाही. नक्षलवाद मोडून काढणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. त्यामुळे या पुस्तकाला मिळालेल्या पुरस्काराची अर्थात या पुरस्कारासाठी पुस्तकाची निवड का आणि कुणामार्फत करण्यात आली या सर्व प्रकरणाचा तपास करण्यात येणार असून त्यामागील रहस्य लवकरच समोर येईल अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली आहे.

 

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!