30 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्र'फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ पुस्तकाला मिळालेल्या पुरस्काराची चौकशी होणार; दीपक केसरकरांची माहिती

‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ पुस्तकाला मिळालेल्या पुरस्काराची चौकशी होणार; दीपक केसरकरांची माहिती

सन 2021 साठी स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांतर्गत प्रौढ वाङ्मय अनुवादित प्रकारातील तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम तुरुंगातील आठवणी व चिंतन’ या पुस्तकाला देण्यात आला आहे. या पुस्तकाच्या निवडीसंदर्भात तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षांनी कुठलीही चर्चा केली नाही अथवा ही बाब निदर्शनास आणून दिली नाही. त्यामुळे या सर्वच प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.

साहित्यामध्ये लेखनाचे स्वातंत्र्य असते. परंतु ज्यावर बंदी आहे, ते लिहिता येत नाही. बंदी घालण्याची एक वेगळी प्रक्रिया असते. ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या पुस्तकावर बंदी नसली तरी राज्यात नक्षलवादाचे उदात्तीकरण होऊ शकत नाही. नक्षलवाद मोडून काढणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. त्यामुळे या पुस्तकाला मिळालेल्या पुरस्काराची अर्थात या पुरस्कारासाठी पुस्तकाची निवड का आणि कुणामार्फत करण्यात आली या सर्व प्रकरणाचा तपास करण्यात येणार असून त्यामागील रहस्य लवकरच समोर येईल अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

एअर इंडियाचा होणार कायापालट; खर्च होणार तब्बल 3300 कोटी

बांग्लादेश विरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात होणार मोठे बदल

काळी जीभ म्हणजे कर्करोगाचे लक्षण; वाचा सविस्तर

“नक्षलवाद्यांमधील 100 टक्के भरती ही आदिवासी बांधवांमधून होत होती, ती बंद झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये शहरी नक्षलवाद जो केला जातो, आपण जसे काही जगावेगळे करत असल्याचे भासवून जे साहित्य लिहिले जाते आणि यात काही लोक सहभागी होतात अशांना समाज क्षमा करु शकत नाही. कुठल्याही परिस्थितीत नक्षलवादाचे उदात्तीकरण हे राज्य शासनाकडून होऊ शकत नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. चौकशीनंतर काय कारवाई करायची यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल’’, असेही मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

दरम्यान, प्रत्येकाला आपले विचार प्रकट करण्यासाठी साहित्याच्या माध्यमातून लेखनाचे संपूर्ण स्वातंत्र्य आहे. परंतू अशा प्रकारचे पुरस्कार दिल्याने साहित्याला प्रोत्साहन मिळत असते. त्यामुळे अशा प्रकारचे पुरस्कार देत असताना संपूर्ण अभ्यास करणे आणि त्याच्या माध्यमातून समाजात द्वेश भावनेचे उदात्तीकरण होणार नाही याी काळजी घेणे गरजेचे असल्याचा सूर देखील केसरकर यांच्या विधानातून उमटला असल्याचे पाहायला मिळत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी