23 C
Mumbai
Thursday, January 16, 2025
Homeमहाराष्ट्रदिल्लीतील संमेलन स्थळाला छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी नाव

दिल्लीतील संमेलन स्थळाला छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी नाव

महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे तसेच सरहद संस्थेचे संजय नहार यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. (The convention venue in Delhi is named Chhatrapati Shivaji Maharaj Sahitya Nagari)

दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे 21 ते 23 फेब्रुवारी 2025 या काळात 98व्या अखिल भारतीय साहित्य संमेलन होणार आहे. आता या संमेलन स्थळाला छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय महामंडळ तसेच सरहद या संस्थेने घेतला आहे. महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे तसेच सरहद संस्थेचे संजय नहार यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. (The convention venue in Delhi is named Chhatrapati Shivaji Maharaj Sahitya Nagari)

धोंडीराम दादा वाघमारे यांनी केली महाराष्ट्रात संविधान दिन साजरा करण्याची सुरुवात

महत्वाची बाब म्हणजे साहित्य संमेलनाला येणाऱ्या लोकांसाठी पुणे-दिल्ली रेल्वे देण्याची मागणी  केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अश्विनी वैष्णव यांना केली आहे. माननीय रेल्वेमंत्री यांनी त्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र, एका रेल्वेत एवढे रसिकांना जागा मिळणे शक्य नाही. त्यामुळे राज्यातील साहित्य रसिकांनी आपापल्या भागातून आपले दिल्लीसाठी आपले तिकीट काढावे. त्यामुळे गडबड होणार नाही,असेही आवाहन संयोजकांनी केले आहे.  (The convention venue in Delhi is named Chhatrapati Shivaji Maharaj Sahitya Nagari)

लाडक्या बहिणीचे पैसे दिले, महागाई वाढवून काढून घेतले

संमेलनाला येणाऱ्यांची सोय करणे शक्य व्हावे, यासाठी आपल्या जवळच्या साहित्य संघात अथवा ऑनलाइन प्रतिनिधी शुल्क भरून दि. 15 जानेवारी 2025 पूर्वी नोंदणी करावी काही अडचण आल्यास 8484055252 या क्रमांकावर संपर्क साधावा. ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा देण्याचा प्रयत्न राहील. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठीचे प्रतिनिधी आवेदन पत्र नोंदणी लिंक https://forms.gle/oH6WxDrXuvUTn7fG6 (The convention venue in Delhi is named Chhatrapati Shivaji Maharaj Sahitya Nagari)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी