29 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरमहाराष्ट्रखोक्यांचा व्यवहार एकनाथ शिंदेंच्या हातून झाल्याचे दिसते; एकनाथ खडसे यांचा आरोप

खोक्यांचा व्यवहार एकनाथ शिंदेंच्या हातून झाल्याचे दिसते; एकनाथ खडसे यांचा आरोप

राज्याच्या राजकारणामध्ये सध्या 50 खोक्यांच्या वाद चांगलाच पेटला आहे. आमदार रवी राणा यांच्या 50 खोक्यांच्या आरोपामुळे आमदार बच्चु कडू यांनी त्यांना 1 तारखेपर्यंत पुरावे सादर करण्याचे आव्हान दिले आहे. हा वाद दिवसेंदिवस पेटतच चालला असून या वादात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडे यांनी देखील उडी घेतली असून त्यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत.

खोक्यांबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार एकनाथ खडसे म्हणाले की, ते खोके आमदार बच्चु कडू यांनी घेतले की, आमदार रवी राणा यांनी घेतले याबाबतचे उत्तर केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच देऊ शकतील, कारण खोके देणेघेण्याचा व्यवहार एकनाथ शिंदे यांच्या हातून झाल्याचे दिसते असा, आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. खोके देणे घेण्यातील खरी वस्तूस्थीती ही आमदार रवी राणा, आमदार बच्चु कडू आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच माहिती असेल असे देखील खडसे यावेळी म्हणाले.
हे सुद्धा वाचा :
मंत्री गुलाबराव पाटील भडकले; रवी राणांना खडे बोल सुनावले!

Nitin Gadkari : गडकरी म्हणतात दिल्लीत हुशारीने काम करावे लागते; पुढची निवडणूक लढण्याबाबत म्हणाले…

Kishori Pednekar : किरीट सोमय्यांनी सात दिवसात आरोप सिद्ध करून दाखवावे : किशोरी पेडणेकर

आमदार रवी राणा आणि आमदार बच्चु कडू यांच्यात सध्या मोठा वाद रंगला आहे, आमदार रवी राणा यांनी आमदार बच्चु कडू यांनी गुवाहाटीला जावून पैसे घेतल्याचा आरोप केला. त्यानंतर आमदार बच्चु कडू संतापले असून त्यांनी राणा यांच्या विरोधात पोलिसांत देखील तक्रार केली आहे. इतकेच नव्हे तर राणा यांनी मी 50 खोके घेतल्याचा पुरावा 1 नोव्हेंबर पर्यंत द्यावा अन्यथा न्यायालयात जाऊन त्यांना नोटीस पाठवू असे इशारा देखील त्यांनी देला आहे. आमदार राणा यांच्या आरोपामुळे शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील आमदार राणा यांना खडे बोल सुनावत आमदार राणा यांनी आपले शब्द मागे घ्यावेत असे म्हटले आहे. तसेच आमदार राणा यांच्या आरोपामुळे 40 आमदारांची बदनामी होत असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी