28 C
Mumbai
Sunday, September 4, 2022
घरमहाराष्ट्रगणेश चतुर्थी व्रत : गणेशोत्सवाचा उत्साह पोहोचला शिगेला

गणेश चतुर्थी व्रत : गणेशोत्सवाचा उत्साह पोहोचला शिगेला

गणेश चतुर्थी हे भाद्रपद शुल्क चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे. गणेशाला प्रसन्न केल्याने घरामध्ये सुख, समृद्धी आणि शांती नांदते त्यामुळे अनेक जण हे व्रत आवडीने करतात. गणपतीला लाल जास्वंदीचे फुल आणि दुर्वा अत्यंत प्रिय आहेत. तसेच मोदक लाडू त्याचा सर्वात आवडता पदार्थ आहे.

गणेश चतुर्थी हे भाद्रपद शुल्क चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे. गणेशाला प्रसन्न केल्याने घरामध्ये सुख, समृद्धी आणि शांती नांदते त्यामुळे अनेक जण हे व्रत आवडीने करतात. गणपतीला लाल जास्वंदीचे फुल आणि दुर्वा अत्यंत प्रिय आहेत. तसेच मोदक लाडू त्याचा सर्वात आवडता पदार्थ आहे. त्यामुळे गणेश चतुर्थीला गणपतीला मोदक लाडु अर्पण केले जातात. गणपतीची मनोभावे पूजा केली जाते. गणपतीची सोळा उपचाराने पूजा केली जाते. त्यानंतर नदी, समुद्र, तलाव अशा प्रकारच्या जलाशयांमध्ये गणपतीचे विसर्जन केले जाते. हे व्रत दीड, पाच, सात, दहा, एकवीस दिवस केले जाते. गणपती घरामध्ये असेपर्यंत अथर्वशीर्ष स्तोत्राचे पठण केले जाते.

गणपती ही संघटनेची देवता आहे. तो गणांचा अधिपती आहे.आपल्या महाराष्ट्रात लोकमान्य टिळकांनी 1894 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला. त्यावेळ पासून सार्वजनिक गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा केला जातो. भारताला स्वातंत्र्य मिळावे, लोकांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी यासाठी टिळकांनी गणेशोत्सव सुरु केला. आता देशाच्या कानाकोपऱ्यात गणेशोत्सव सुरु आहे. इतकेच नव्हे तर परदेशात देखील गणेशोत्सव मोठया धुम धडाक्यात साजरा केला जातो.

गणपतीच्या जन्माची कथा :पार्वती देवी एकदा स्नानासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी त्यावेळी त्यांनी बाहेर लक्ष ठेवण्यासाठी मळापासून एक मुर्ती बनवली. ती जिवंत केली. या मुर्तीला पहारेकरी नेमले आणि सांगितले की, कोणालाही आतमध्ये येऊ देवू नको. काही वेळाने भगवान शंकर आले. त्यांना गणपतीने अडवले. त्यामुळे ते अत्यंत क्रोधीत झाले. त्यांनी त्याचे धड वेगळे केले.

हे सुद्धा वाचा

Gautam Adani : गौतम अदानी ठरले जगातले तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती

Nitin Gadkari : नितीन गडकरींनी केले पुन्हा एकदा सूचक वक्तव्य

VIDEO : ‘फेटेवाले बाप्पा’

पार्वती देवींनी हे पाहिल्यानंतर त्या संतापल्या. त्यानंतर मग जो पहिला प्राणी दिसला त्याचे मुंडके कापून आणले. तो प्राणी होता हत्ती. त्यामुळे गणपतीला सोंड आहे. त्याचे नाव गजानन आहे. भगवान शंकरांनी त्याला गणांचा प्रमुख नेमले. त्याला गणाधिश या नावाने ओळखले जाऊ लागले.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी