31 C
Mumbai
Tuesday, August 2, 2022
घरमहाराष्ट्रशिंदे-फडणवीस सरकारने 'डिसले गुरुजीं'चा राजीनामा नामंजूर केला

शिंदे-फडणवीस सरकारने ‘डिसले गुरुजीं’चा राजीनामा नामंजूर केला

टीम लय भारी

मुंबई: ‘ग्लोबल पुरस्कार’ मिळालेल्या रणजितसिंह डिसले गुरुजींनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर शिक्षकांबाबत चुकीचं काम होऊ नये,असे स्पष्ट निर्देश शिक्षण विभागाला दिले होते. यानंतर शिक्षण विभागाने डिसले गुरुजींचा राजीनामा नामंजूर केला आहे.

जागतिक पुरस्कार विजेत्या डिसले गुरुजींंनी कारवाईला वैतागून राजीनामा दिला होता. डिसले गुरुजींचा राजीनामा परत घेण्याबाबत कारवाई सुरू असून, हा राजीनामा परत घेण्याऐवजी आता जिल्हा प्रशासन हा राजीनामा नामंजूर करणार असल्याची माहिती मिळाली आहे. यासंदर्भात शिक्षण आयुक्तांकडून जिल्हा मुख्याधिकाऱ्यांना लेखी सूचना देखील दिल्या आहेत. तर मुख्याधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना इथून पुढे बाहेर न बोलण्याच्या लेखी सूचना दिल्या असल्याची देखील माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

गेल्या आठवड्यातच डिसले गुरुजींंनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर डिसले गुरुजी म्हणाले होते की, मी सर्व वस्तुस्थिती मांडली. त्यांच्यासमोर सर्व कागदपत्रं ठेवली. त्यावर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. या सर्व प्रकरणावर मी 8 ऑगस्टला भूमिका मांडणार आहे. जागतिक पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी राजीनामा दिला होता.

त्यांनी 6 जुलैला वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्यासंदर्भातील पत्र शिक्षण विभागाकडे दिले आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नावलौकिक करणाऱ्या शिक्षकाला शासनाची नोकरी का सोडावी वाटली ? हा प्रश्न निर्माण झाला होता. ‘ग्लोबल पुरस्कार’ विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले हे 2017 ते 2020 या काळात गैरहजर असल्याची प्रशासनाची माहिती खोटी निघाल्यानंतर त्यांच्यावर केलेला स्वत:चा पगार स्वत: काढल्याचा आरोपही खोटा असल्याचे समोर आले होते.

हे सुध्दा वाचा:

चक्क ‘वाघोबां’साठी वाहतूक थांबवली

अभिनेत्री कंगना रनौतची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंसाठी खास पोस्ट

कोरोनाचे संकट पुन्हा वाढले, 24 तासांत तब्बल 60 जणांचा मृत्यू

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!