30 C
Mumbai
Saturday, September 3, 2022
घरमहाराष्ट्रAjit Pawar :'पन्नास खोके एकदम ओके' या घोषणा सत्ताधाऱ्यांना झोंबल्या- अजित पवार

Ajit Pawar :’पन्नास खोके एकदम ओके’ या घोषणा सत्ताधाऱ्यांना झोंबल्या- अजित पवार

या सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत. 'पन्नास खोके एकदम ओके' ही घोषणा सत्ताधाऱ्यांना खूपच झोंबली असल्याचे त्यांच्या वागण्यातून द‍िसून येत आहे.

आज विधीमंडळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अभूतपूर्व राडा झालेला संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. त्या विषयी आज माध्यमांसमोर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी प्रतिक्रीया द‍िल्या. यावेळी अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, 17 तारखेपासून विधीमंडळाचे अधिवेशन सुरु झाले. त्यावेळपासून आम्ही या पायऱ्यांवर बसून रोज 10.30 वाजता घोषणा देत होतो. त्या घोषणा सत्ताधाऱ्यांना चांगल्याच झोंबल्या आहेत. त्यामुळेच ते हामरीतुमरीवर आले.

भाजप हे च‍िडीचे राजकारण करत आहे. चोराच्या मनात चांदणं अशी त्यांची अवस्था झाली आहे. शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत. आमच्या घोषणांमुळे त्यांची प्रतिमा मलिन झाली की, काय अशी शंका येऊ लागली आहे, असेही अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

हे सुद्धा वाचा

Terrorism: पुण्यात एटीएसने एका दहशवाद्याच्या मुसक्या आवळल्या

MPSC Result : गरीबीवर मात करत मुलगी बनली ‘क्लास वन’ ऑफिसर

Ashtavinayak Darshan : दुसरा गणपती – भक्तांची चिंताहरण करणारा थेऊरचा ‘चिंतामणी’

या सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत. ‘पन्नास खोके एकदम ओके’ ही घोषणा सत्ताधाऱ्यांना खूपच झोंबली असल्याचे त्यांच्या वागण्यातून द‍िसून येत आहे. त्यांच्या मनाला हे लागले आहे. काल मुख्यमंत्री बोलतांना म्हणाले की, मी समज देतो. सत्ताधारी पक्षाने हवे तसे काम करायचे असते, विरोधकांना काम पसंत न पडल्यास विरोध करायचा हे विधीमंडळाच्या अधिवेशनात चालते. आम्ही सत्तेमध्ये होतो. त्यावेळी ते घोषणा द्यायचे.

आता कोणत्या कारणाने त्यांनी सरकार पाडले आहे. ते जनतेला समजले आहे, त्यामुळेच ते चीडले आहेत. त्यामुळे आपल्या विरोधात घोषण द्यायच्या नाहीत असे सत्ताधाऱ्यांना वाटते. अजित पवार म्हणाले की, मी 1990 पासून राजकारणात आहे. आता आम्ही घोषणा देत आहोत ते शिंदे गटाला आवडलेले नाही, म्हणून त्यांनी हा केव‍िलवाणा प्रयत्न केला, असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

महाविकास आघाडी सरकारने आडीच वर्षे राज्य केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करुन दुसरा पक्ष स्थापन केला. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळे वळण लागले. तब्ब्ल 40 दिवसानंतर राज्याला मंत्री मंडळ लाभले. त्यामध्येही काही जणांचे खाते वाटप बाकी आहे. इतके दिवस दगा दिल्याच्या भावना विरोधकांच्या मनात दाटून आल्या होत्या. माध्यमांवरुन त्यांनी आपले मन हलके केले असले तरी प्रत्यक्ष समोरासमोर आल्यावर भावनांचा स्फोट झाला.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी