दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानामुळे (Temperature) राज्यात उष्णतेचा सामना करावा लागत आहे. या दमट उष्णतेमुळे उष्माघाताच्या (Heat stroke ) रुग्णांची संख्या ही वाढत आहे एक मार्चपासून राज्यात 251 जणांना उष्माघाताची (Heat stroke ) लागण झाली आहे. सध्या धुळे नाशिक आणि जालना या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत राज्यात उष्णतेचे प्रमाण वाढत असून काही जिल्ह्यांमध्ये तापमान (Temperature) 40°c च्या पुढे गेले आहे.(The state reported 251 heat stroke cases in 81 days; Cases rise in Dhule, Nashik, Jalna)
१ मार्च ते 20 मे पर्यंत राज्यात उष्णतेच्या लाटेत २५१ रुग्ण आढळून आले आहेत यापैकी गेल्या 24 दिवसात उष्माघाताचे (Heat stroke ) रुग्ण आढळले आहेत मुंबईत उष्माघाताचा एकही रुग्ण नसला तरी ठाण्यात पालघर मध्ये एक रुग्ण आढळून आला आहे. मार्च या तुलनेत एप्रिल आणि मे मध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. उष्माघाताचे रुग्णांची नोंदणी मार्चपासून सुरू करण्यात आली आहे राज्यात उष्माघाताच्या 251 रुग्णांची नोंद झाली असून एप्रिलमध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. मार्चमध्ये 40 1 ते 26 एप्रिल पर्यंत 144 आणि 26 एप्रिल ते 20 मे या कालावधीत 67 रुग्ण आढळले आहेत.
कमी रुग्ण असलेले जिल्हे
भंडारा हिंगोली पालघर रत्नागिरी आणि सांगली जिल्ह्यात प्रत्येकी एक रुग्ण रायगड वसीम बीडमध्ये प्रत्येकी दोन रुग्ण अमरावती अहमदनगर छत्रपती संभाजीनगर मध्ये प्रत्येकी तीन रुग्ण जळगाव आणि अकोला येथे पाच रुग्ण आहेत रुग्ण आढळले आहेत. तसेच गडचिरोली गोंदिया कोल्हापूर ठाणे वर्धा येथे प्रत्येकी सहा आणि पुण्यात आठ रुग्ण आढळले आहेत. या सहा जिल्ह्यांमध्ये राजूर नंदुरबार या जिल्ह्याव्यतिरिक्त मुंबई शहर आणि उपनगरात उस्मानाबादचा एकही रुग्ण आढळलेला नाही.
सर्वाधिक रुग्ण असलेले जिल्हे
धुळे 20 नाशिक 28 जालना 28 बुलढाणा 22 परभणी 12 धुळे 20 सोलापूर 18 नागपूर 11