लय भारीचे संपादक तुषार खरात यांनी नुकताच सांगोला विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला(The supporters of Shahaji Bapu Patil got agitated as soon as the name of Jayakumar Gore ). आमदार शहाजीबापू पाटील यांच्या चीकमहूद या गावी तुषार खरात यांनी भेट दिली. गावातील सामान्य लोकांच्या भावना जाणून घेत असताना यावेळी शहाजीबापू पाटील यांचे कार्यकर्ते काहीसे आक्रमक झाले.
शहाजीबापू पाटील सांगोल्यात परतले अन् म्हणाले, बोकडाचं मटण कसे ओरपायचे ते शिकवतो
आमच्याही प्रतिक्रिया घ्या, मुलाखती घ्या, असा आग्रह शहाजीबापू पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केला. यावेळी दिवंगत गणपतराव देशमुख व विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांचे कार्यकर्ते समोरासमोर आले. दोन्हीही कार्यकर्ते आपापली बाजू नेटाने लावून धरत होते. यावेळी माण – खटावमधील आमदार जयकुमार गोरे यांच्या गुंडगिरीचा उल्लेख संपादक तुषार खरात यांनी केला. शहाजीबापू पाटील यांच्या गावात दोन्ही बाजूचे कार्यकर्ते लोकशाही पद्धतीने विचार मांडत आहेत. पण माण – खटाव मतदारसंघात अशा पद्धतीने विचार मांडण्याची सोय नाही,
शहाजी बापू पाटील यांना प्राध्यापक नरकेंनी खडे बोल सुनावले
असा उल्लेख तुषार खरात यांनी केला. यावर शहाजीबापू पाटील यांचे कार्यकर्ते खवळले. माण – खटावच्या आमदारांविषयीचे प्रश्न त्यांच्या मतदारसंघात विचारा. आमच्या मतदारसंघात कशाला विचारता असा सवाल शहाजीबापू पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी केला. तर कै. गणपतराव देशमुख व डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार देशात कुठेही फिरू शकतात. कोणाही बद्दल प्रश्न विचारू शकतात. माण – खटाव मतदारसंघ हा माढा लोकसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रातच येतो. त्यामुळे माणविषयी या ठिकाणी प्रश्न विचारायला काहीच हरकत नाही, अशी भावना देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
Shahajibapu Patil | Babasaheb Deshmukh | सांगोल्याचा कल कुणाकडे ?