27 C
Mumbai
Thursday, August 4, 2022
घरमहाराष्ट्रचक्क 'वाघोबां'साठी वाहतूक थांबवली

चक्क ‘वाघोबां’साठी वाहतूक थांबवली

टीम लय भारी

चंद्रपूर: रस्त्यांनी कोणी मोठी व्यक्ती जाणार असेल, तर वाहतूक तात्काळ थांबवण्यात येते. चंद्रपूरमध्ये चक्क वाघोबाला रस्ता ओलांडून जाण्यासाठी वाहतूक थांबवण्यात आली होती. चंद्रपूर जिल्ह्यातील जंगली भागात वाघांचा सातत्याने वावर असतो. नागभीड-ब्रम्हपुरी महामार्गावरील सायगाटा येथे दोन दिवसांपूर्वी घडलेल्या त्या घटनेची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

नागभीड-ब्रम्हपुरी महामार्गावरुन वाहनांची मोठी वर्दळ सुरु होती. त्यामुळे रस्त्याच्याकडेला असलेल्या वाघाला रस्ता ओलांडणे शक्य नव्हते. रस्ता काही मोकळा होत नव्हता. ही बाब वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी लागलीच दोन्ही बाजूंची वाहतूक काही वेळेसाठी थांबवली आणि वाघाला मार्ग मोकळा करुन दिला.

वन्यप्राणी आता मानव वस्तीकडे येतांना दिसत आहेत. जंगल परिसरात या घटना अधिकच घडतात. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वाहनधारकांनी अगदी जवळून वाघाचे चित्रण केले. वन विभागाचे अधिकारी तेथेच असल्याने प्रवाशांचे धाडस वाढले होते. काही सेकंदाचा हा अनुभव अंगावर काटा आणणारा होता.

हे सुध्दा वाचा:

CBSE बोर्डाचा १२ वीचा निकाल जाहीर

कोरोनाचे संकट पुन्हा वाढले, 24 तासांत तब्बल 60 जणांचा मृत्यू

निष्ठा यात्रेनंतर शिवसेनेला भिवंडीत बसला धक्का

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!