28 C
Mumbai
Thursday, August 4, 2022
घरमहाराष्ट्रपश्चिम द्रुतगती महामार्ग गेला पाण्यात

पश्चिम द्रुतगती महामार्ग गेला पाण्यात

टीम लय भारी

पालघर: पालघर जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. चार दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग पाण्यात गेला आहे. या महामार्गाला नदीचे स्वरुप आले आहे. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांना मार्गक्रमण करणे अवघड झाले आहे. अनेक ठिकाणी वाहने उभी असलेली दिसत आहेत.

गेल्या अनेक महिन्यांपासून या महामार्गावर उड्डाण पूलाचे काम सुरु आहे. त्यामुळे अजूबाजूला मातीचे ढीग पसरले आहेत. तसेच बांधकामामुळे अवजड वाहनांना प्रवास करतांना त्रास सहन करावा लागत आहेत. त्यात सुरु असलेल्या धुवाधार पावसामुळे जास्त प्रमाणात पाणी साचले आहे. ससूनवघर ते वसई फाटयापर्यंत वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.

हे सुध्दा वाचा:

द्रौपदी मुर्मू यांचा मुंबई दौरा

भारतात ‘नैरोबी फ्लाय’ माशीची दहशत

पन्हाळगडाच्या पडझडीला केंद्र सरकार जबाबदार

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!