उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सामान्य मराठी लोकांमध्ये सहानुभूतीची लाट आहे(There is a wave of sympathy among common Marathi people for Uddhav Thackeray). दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला पक्ष भाजपने फोडला. उद्धव ठाकरे यांनी ज्या एकनाथ शिंदे यांना मोठे केले, त्याच शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला. एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या मुलाचे सरकार पाडण्याचे पाप केले.
उद्धव ठाकरेंवर कारवाई करा; केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश
त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याविषयी सामान्य लोकांमध्ये सहानुभूती आहे. पण उद्धव ठाकरेंविषयी या ठिकाणी वेगळाच किस्सा सांगायचा आहे. उद्धव ठाकरे हे विद्वान व बुद्धिजीवी लोकांना नेहमीच पाठींबा देत आले आहेत. व्हिजेटीआय या संस्थेमध्ये १५ – २० वर्षांपूर्वी प्रा. के. जी. नारायणखेडकर हे संचालक होते. त्यावेळी व्हिजेटीआयमधील शिवसेनेच्या कर्मचाऱ्यांनी मोठे आंदोलन केले होते.
उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांना धू धू धुतले !
नारायणखेडकर यांना खूर्चीत बसू न देण्याची भूमिका शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घेतली होती. पण उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची ही चुकीचा भूमिका हाणून पाडली. एवढेच नव्हे तर, के. जी. नारायणखेडकर यांना सन्मानाने त्या खूर्चीत पुन्हा बसविण्याची सूचना केली. बऱ्याचदा मोठ्या व्यक्ती आपले मन इतके मोठे दाखवतात की, त्यांच्या मोठेपणाबद्दल करावे तितके कौतुक कमीच वाटते. पण आपल्या नेत्याच्या मनाच्या मोठेपणाचा इतिहास ठावूक नसलेले चेले चपाटे असे काही बावळटासारखे वागतात की, आपल्या हातून आपल्याच नेत्याच्या कार्याला काळीमा फासतात. युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंचा हा किस्सा लक्षात ठेवायला हवा.