26.8 C
Mumbai
Monday, February 10, 2025
Homeमहाराष्ट्रसमानपुरात पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकरांचे भव्य स्मारक व्हावे- आ.सत्यजित तांबे

समानपुरात पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकरांचे भव्य स्मारक व्हावे- आ.सत्यजित तांबे

विधानपरिषदेत केली 1 कोटी निधीची मागणी

तत्त्वज्ञानी महाराणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा संगमनेर तालुक्यातील विविध गावांशी त्या काळात मोठा संबंध आला असून त्यांच्या कार्याची ओळख पुढील पिढ्यांना सदैव प्रेरणादायी राहावी याकरता समनापुर येथे त्यांचे भव्य स्मारकासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत केली आहे. (There should be a grand memorial of Punyashlok Ahilya Devi Holkar in Samanpur – MLA Satyajit Tambe)

 

विधान परिषदेत बोलताना नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुका हा सततच्या विकास कामातून वैभवशाली बनला असून या तालुक्याला मोठा ऐतिहासिक वारसा असून तत्त्वज्ञानी महाराणी म्हणून ओळख असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा संगमनेर तालुक्यातील अनेक गावांशी त्या काळात संबंध आला आहे. त्यांच्या कार्यकाळात तालुक्यातील विविध गावांमध्ये त्यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी बारव निर्माण केल्या आहेत. (There should be a grand memorial of Punyashlok Ahilya Devi Holkar in Samanpur – MLA Satyajit Tambe)

 

तरी समनापुर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारक होण्यासाठी विशेष बाब म्हणून जिल्हा नियोजन अथवा कोणत्याही उचित निधीतून एक कोटी रुपयांचा निधी प्रस्थापित करावा व तातडीने हे भव्य स्मारक निर्माण करावी अशी आग्रही मागणी सत्यजित तांबे यांनी केली आहे. (There should be a grand memorial of Punyashlok Ahilya Devi Holkar in Samanpur – MLA Satyajit Tambe)

 

सोबतच काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरच्या हायटेक बसस्थानका समोरील दर्शनी भागामध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ पुतळा व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा सध्या असलेल्या पुतळ्याच्या जागेवर त्यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार असल्याची माहिती ही आमदार सत्यजित तांबे यांनी दिली आहे. (There should be a grand memorial of Punyashlok Ahilya Devi Holkar in Samanpur – MLA Satyajit Tambe)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी