कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(This government is on the run). गेल्या सलग पाच वेळा ते या ठिकाणी निवडून आले आहेत. त्यांच्या विरोधात महायुतीचा कोणता उमेदवार असेल हे अद्यापही निश्चित नाही. धैर्यशील कदम हे विद्यमान सातारा भाजपाचे अध्यक्ष आहेत. त्यांचे नाव चर्चेत आहे परंतु त्यांचा निभाव लागेल असे वाटत नाही लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी कराड उत्तर मतदारसंघातील सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.
अजित पवार पळपुटे | शरद पवारांचा वारसा सुप्रिया सुळे, रोहित पवार चालवतील | Sanjaymama Shinde
बाळासाहेब पाटील हे शरद पवार यांच्यासोबत प्रामाणिक राहिले ते गद्दार करणारे अजित पवार यांच्यासोबत गेले नाहीत त्यांचे कौतुक स्थानिक जनता करीत आहे. एकनाथ शिंदे हे मूळचे साताऱ्याचे आहेत. अजित पवार यांच्यावर सातारा जिल्ह्याने भरपूर प्रेम केले होते. पण एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी आपापले पक्ष फोडले हे फार चुकीचे केले. अशी भावना सामान्य जनता व्यक्त करत आहे. सातारा जिल्ह्या हा यशवंतराव चव्हाण यांचा जिल्हा आहे. त्यामुळे गद्दार फोडाफोडी पाडापाडी असल्या विचाराला साताऱ्यामधील जनता थारा देत नाही. अशी भावना येथील नागरिक जनता व्यक्त करीत आहेत.