32 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रठाकरेंचे आणखी तीन खासदार, आठ आमदार शिंदे गटात येणार!; शिंदे गटातील 'या'...

ठाकरेंचे आणखी तीन खासदार, आठ आमदार शिंदे गटात येणार!; शिंदे गटातील ‘या’ नेत्याचा दावा

नुकतेच खासदार गजानन किर्तिकर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर दिपाली सय्यद यांनी देखील ठाकरेंची साथ सोडली असून त्या शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. त्यातच आता ठाकरे गटातील म्हणजेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील आणखी तीन खासदार आणि आठ आमदार शिंदे गटात (बाळासाहेबांची शिवसेना) येणार असल्याचा दावाच बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करत 12 खासदार आणि 40 आमदार फोडले. त्यानंतर त्यांनी भाजपसोबत राज्यात सत्ता देखील स्थापन केली. शिंदे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना शह देत पक्षावर देखील दावा सांगितला आहे. तसेच आज देखील ठाकरे गटातील नेत्यांना ते आपल्या गटात सामील करुन घेत आहेत. नुकतेच खासदार गजानन किर्तिकर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर दिपाली सय्यद यांनी देखील ठाकरेंची साथ सोडली असून त्या शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. त्यातच आता ठाकरे गटातील म्हणजेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील आणखी तीन खासदार आणि आठ आमदार शिंदे गटात (बाळासाहेबांची शिवसेना) येणार असल्याचा दावाच बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे. प्रतापराव राधव यांच्या या दाव्यामुळे सध्या राजकीय वर्तुळाच चर्चांना उधाण आले आहे.

खासदार प्रतापराव जाधव म्हणाले की. निवडणुकीच्या तोंडावर आणखी तीन खासदार आणि आठ आमदार शंभर टक्के बाळासाहेबांच्या शिवसेनेत येतील, नुकताच खासदार गजानन किर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहेत. किर्तिकर यांच्या नंतर आणखी काही लोक आमच्या संपर्कात आहेत, काही स्थानिक पातळीवरच्या अडणींमुळे तसेच जिल्ह्यातील त्यांची काही कामे बाकी असल्याने सध्या ते तिकडे आहेत, मात्र निवडणूका जाहीर झाल्यानंतर ठाकरेंचा गट पूर्ण रिकामा होईल असा दावा खासदार प्रतापराव चिखलीकरांनी केला आहे. त्यामुळे आता आणखी कोण नेते ठाकरे यांची सोथ सोडणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटात वर्चस्वाची लढाई सुरू आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षावरच दावा केल्याने सध्या निवडणूक आयोगासमोर त्याची सुनावणी सुरू आहे, शिंदे यांच्या या दाव्यामुळे शिवसेनेचे पक्ष चिन्ह आणि नाव देखील अंधेरी पोटनिवडणूकीत बदलावे लागले होते. शिंदे यांच्या गटागकडून राज्यभरात पक्षप्रवेश करवून घेतला जात आहे, शिवसेनेतील अनेक पदाधिकारी शिंदे गटात जात आहेत, तर अनेक कार्यकर्ते ठाकरे गटात देखील प्रवेश करत आहेत. अनेक शाखांवरुन देखील सध्या वादाची ठिणगी पडलेली आहे.
हे सुद्धा वाचा :
Narendra Modi: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद ईब्राहिमच्या हस्तकांकडून मोदींच्या हत्येचा कट ?; मुंबई पोलिसांना ऑडिओ मेसेज

Tushar Gandhi : ‘गांधी हत्येसाठी सावरकरांनी नथुराम गोडसेला मदत केली’ तुषार गांधींचा खळबळजनक दावा

Kokan Festival : मुलुंडमध्ये बुधवारपासून अस्सल कोकणी संस्कृतीचा ‘कोकण महोत्सव’

अनेक ठिकाणी कुटुंबांमध्ये देखील फुट पडलेली आहे. खासदार गजानन किर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या मुलाने मात्र ठाकरेंसोबत कायम राहण्याचा निर्धार व्यक्त केला, तसेच खासदार प्रतापराव जाधव यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांचे बंधु आणि मेहकर पालिकेचे नगराध्यक्ष संजय जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. राज्यात ठिकठिकाणी असे वातावरण असताना आता पुन्हा ठाकरे गटातील तीन खासदार शिंदे गटात येणार असल्याचा दावा खासदार जाधव यांनी केल्यानंतर राजकीय चर्चांना पुन्हा उत आला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी