27 C
Mumbai
Tuesday, August 2, 2022
घरमहाराष्ट्रयावर्षी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस पंतप्रधान मोदींसोबत

यावर्षी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस पंतप्रधान मोदींसोबत

टीम लय भारी

मुंबई: राज्याचे नवे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस होता. त्यांना राज्यातून भरभरुन शुभेच्छा मिळाल्या. तर त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील त्यांना गोड शुभेच्छा दिल्या आहे. सोशल मीडियावर या शुभेच्छा व्हायरल झाल्या आहेत. आज सायंकाळी माजी माजी राष्टपती रामनाथ कोविंद यांचा निरोप समारंभ दिल्लीमध्ये आहे. या कार्यक्रमात ते हजर राहणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत. त्यामुळे या वर्षीचा वाढदिवस हा देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी खास आहे.

तर देवेंद्र यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही वाढदिवसा निमित्त गोड शुभेच्छा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.’ जिलेबी कितीही आडवळणी असो, तिची चव कायम गोडच असते’. अशा आशयाचं ट्विट अमृता यांनी केलं आहे. अगदी त्याचप्रमाणे ‘महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी कितीही आडवळणे आली तरी, अडथळ्यांची शर्यत पार करीत त्यातून सुखद वाट सातत्याने शोधत कायम विकासाचा गोडवा पसरविणारे देवेंद्र फडणवीसजी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा’ !

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज देशाचे मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या निरोपासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी दिल्लीला रवाना झाले. दिल्लीतील हॉटेल अशोकामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, देशातील सर्वच राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

हे सुध्दा वाचाः

काॅंग्रसचे नेते निघाले ‘अतिवृष्टी’ दौऱ्यावर

या वर्षीचा वाढदिवस साधेपणानेच करा- अजित पवार

’या‘ कंपन्यांनी उचलले कामगार कपातीचे पाऊल

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!