29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रआता तृतीयपंथींही पोलीस होणार; मॅटने दिले नवे आदेश

आता तृतीयपंथींही पोलीस होणार; मॅटने दिले नवे आदेश

राज्यात पोलीस भरती प्र्क्रियेत सर्वच घटकांना आरक्षण तसेच विविध माध्यमातून सामावून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासह आता तृतीयपंथींना देखील या भरतीमध्ये अर्ज करता येणार आहे. त्यासाठी 4 डिसेंबरपर्यंत ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देऊन तृतीयपंथींना भरती प्रक्रियेत सामावून घेण्यात यावे, असा आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) यांनी नुकतेच आदेश दिले आहेत.

राज्यात सध्या पोलीस भरतीचे वातावरण जोशात सुरू आहे. अनेक मुलं-मुली आयुष्यात पोलीस होण्याचं स्वप्न मनात बाळगून प्रत्येक वर्षी पोलीस भरतीच्या कसोटीला सामोरे जात असतात. गेल्या 2 वर्षांत संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले होते. त्यामुळे गेले 2 वर्षी पोलीस भरतीची प्रक्रिया देखील रखडली होती. मात्र यंदा या प्रक्रियेला पुन्हा एकदा सुरुवात झाली आणि पूर्वीप्रमाणेच परिक्षार्थींची रेलचेल सुरू झाल्याचे दिसून आले. यामध्ये काही कालावधीसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेत अडचणी निर्माण झाल्याचे आढळून आले. मात्र यावर उपाय म्हणून महाराष्ट्र सरकराने फॉर्म भरण्यासाठी 15 दिवसांची मुदत वाढवून दिली त्यामुळे पुन्हा एकदा वातावरण आनंदमय झाले. अशांतच आता पोलीस भरती प्रक्रियेतील आणखी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.

यावेळी राज्यात पोलीस भरती प्रक्रियेत सर्वच घटकांना आरक्षण तसेच विविध माध्यमातून सामावून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासह आता तृतीयपंथींना देखील या भरतीमध्ये अर्ज करता येणार आहे. त्यासाठी 4 डिसेंबरपर्यंत ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देऊन तृतीयपंथींना भरती प्रक्रियेत सामावून घेण्यात यावे, असा आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) यांनी नुकतेच आदेश दिले आहेत.

हे सुद्धा वाचा

…तर भाजपचे 10 खासदारही निवडून येणार नाहीत, संजय राऊतांचे आव्हान

जानेवारी 1995 नंतर जन्मलेल्या सरपंच आणि पंचायत सदस्यांना आता 7 वी उत्तीर्ण असणे आवश्यक, महाराष्ट्र सरकारचा निर्णय

ऋतुराज गायकवाड पुन्हा ठरला महाराष्ट्राचा तारणहार ! अंतिम सामन्यात धमाकेदार प्रवेश

ट्रान्सजेंडर यांच्यासाठी कोणत्याही प्रकारचे आरक्षण पोलीस भरतीमध्ये यापूर्वी नव्हते. त्यामुळे पोलीस भरतीमध्ये लैंगिकतेवरून भेदभाव होत असल्याचा आरोप तृतीयपंथींनी केला होता. त्यानंतर तृतीयपंथींच्या हक्कासाठी लढादेणाऱ्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी याविरोधात आवाज उटवण्यास सुरुवात केली होती. अनेकांनी यावर लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा यासाठी यावर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मॅट कडे पत्र पाठवत विनंतीचा अर्ज केला होती. आता या सर्व लढ्याला यश आल्याचे चित्र दिसत आहे.

दरम्यान, गेल्या काही वर्षात देशांत तृतीयपंथींना आदराचे स्थान मिळण्यास सुरुवात झाली आहे. याआधी समाजात उपेक्षित भावनेने वावरणाऱ्या तृतीयपंथींनी समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे यासाठी अनेक निर्णय गेला काही वर्षात घेतले आहे. अशांतच आता पोलीस भरती प्रक्रियेत घेण्यात आलेल्या या निर्णयाचे सगळीकडून कौतुक केले जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी