30 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
Homeमहाराष्ट्रTrupti Sandbhor : नांदेड वाघाला मनपाच्या आयुक्तपदी तृप्ती सांडभोर यांची नवनियुक्ती

Trupti Sandbhor : नांदेड वाघाला मनपाच्या आयुक्तपदी तृप्ती सांडभोर यांची नवनियुक्ती

राज्यात सध्या सुरू असणाऱ्या या बदली सत्रामुळे अधिकारी वर्गामध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली असून शिंदे - फडणवीस सरकार केवळ आपल्या - आपल्या सोयीच्या अधिकाऱ्यांना स्वजिल्ह्यात आणण्याचे काम सुरू असल्याच्या भावना व्यक्त करण्यात येऊ लागल्या आहेत. 

नांदेड वाघाला महानगरपालिकेच्या आयुक्तपदी तृप्ती सांडभोर (Trupti Sandbhor) यांची नवनियुक्ती झाली असून याआधी हे पदभार सांभाळणारे डाॅ. सुनिल लहाने यांची शासनाकडून बदली करण्यात आली आहे. राज्यातील सत्तांतराच्या नाट्यानंतर अधिकाऱ्यांच्या बदली सत्राला भलताच वेग आला आहे. या आधी सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आणि त्यानंतर लगेचच लहाने यांची बदली करण्यात आली. त्यामुळे बदलीच्या या सत्रावर आता संशय व्यक्त करण्यात येत असून भाजप – शिंदे सेना आपल्या सोयीप्रमाणे या बदल्या करून घेत असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू झाल्या आहेत. केवळ दहा दिवसांच्या अंतराने झालेल्या या बदल्यांवर अनेकांकडून आश्चर्य सुद्धा व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड वाघाला महानगरपालिकेचे आयुक्त डाॅ. सुनिल लहाने यांची शासनाकडून बदली करण्यात आली असून त्या जागी तृप्ती सांडभोर या पदभार सांभाळणार आहेत. नवीन पदभार सांभाळण्याआधी तृप्ती सांडभोर या पनवेल महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कारभार पाहत होत्या. दरम्यान शासनाने मंगळवारी उशीरा या नव्या नियुक्तीबाबत आदेश काढून तृप्ती सांडभोर यांना नांदेड वाघालाचे आयुक्तपद तर डाॅ. सुनिल लहाने यांना परभणीचे आयुक्तपद दिले आहे.

हे सुद्धा वाचा…

Ramraje Naik Nimbalkar : जयकुमार गोरे यांच्यामुळे माणमधील औद्योगिक कॉरिडॉर कोरेगावला स्थलांतरीत झाला, रामराजे नाईक निंबाळकर यांचा गंभीर आरोप

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने देशवासीयांना दिल्या शुभेच्छा

दरम्यान, राज्यातील सत्तांतराच्या गोंधळानंतर नव्याने शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाले आणि राजकीय वर्तुळात वेगळेच वारे वाहू लागले. या गोंधळाचा फटका आता अधिकारी वर्गाला सुद्धा बसत असून त्यांच्या बदलीचे सत्रच सुरू झाले आहेत. अवघ्या दहा दिवसांपूर्वीच नांदेडचे जिल्हाधिकारी डाॅ. विपीन इटनकर यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले होते. त्यांच्या बदलीनंतर अद्याप या पदावर कोणत्याच अधिकाऱ्याची वर्णी लागलेली नाही, त्यामुळे कोणी पात्र अधिकारी सरकारला मिळत नाहीत का असा सवालच आता नागरिकांमधून उपस्थित करण्यात येत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीनंतर नांदेड वाघाला महानगरपालिकेचे आयुक्त डाॅ. सुनिल लहाने यांची सुद्धा बदली करण्यात आली असून त्यांची परभणीच्या आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. राज्यात सध्या सुरू असणाऱ्या या बदली सत्रामुळे अधिकारी वर्गामध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली असून शिंदे – फडणवीस सरकार केवळ आपल्या – आपल्या सोयीच्या अधिकाऱ्यांना स्वजिल्ह्यात आणण्याचे काम सुरू असल्याच्या भावना व्यक्त करण्यात येऊ लागल्या आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी