29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रदोन जुळ्या बहिनींचा एकाच मुलाशी विवाह, आगळ्या-वेगळ्या नात्याची सर्वत्र चर्चा

दोन जुळ्या बहिनींचा एकाच मुलाशी विवाह, आगळ्या-वेगळ्या नात्याची सर्वत्र चर्चा

सोलापूर जिल्ह्यातील अकलूज (ता. माळशिरस) येथे दोन जुळ्या बहिणींनी एकाच मुलाशी विवाह केलाय. सोशल मीडियावर या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. एकाच मुलासोबत, एकाच वेळी सख्ख्या बहिणींच्या या आगळ्या वेगळ्या लग्नाची आता सोशल मीडियावर चर्चा होतीये.

आजकालच्या जगात प्रेम ही गोष्ट काही नवीन राहिलेली नाही. प्रेमापोटी अनेक अनपेक्षित गोष्टी घडत असल्याचे आपण पाहतो. अनेकदा काहीजण स्वतःवर आतोनात प्रेम करतात त्यामुळे स्वतःशीच लग्न करून सुखथी राहणारे लोकही भारतात आहेत. शिवाय समलैंगिक विवाह देखील आजकाल भारतात कायद्याच्या अख्यारीत आहे. अनेकवेळा एका व्यक्तीवर एकपेक्षा जास्त माणसे प्रेम करत असल्याचे ऐकायला मिळते. यातून होणारे वाद आणि भांडणे काही नविन नाहीत. पण एकाच पुरुषावर दोन जुळ्या बहिणींचे प्रेम आणि त्या दोन्ही बहिणींनी एकाच मुलाशी केलेला विवाह ही गोष्ट ऐकायला थेटी विचित्र वाटते. पण खरी आहे.

सोलापूर जिल्ह्यातील अकलूज (ता. माळशिरस) येथे दोन जुळ्या बहिणींनी एकाच मुलाशी विवाह केलाय. सोशल मीडियावर या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. एकाच मुलासोबत, एकाच वेळी सख्ख्या बहिणींच्या या आगळ्या वेगळ्या लग्नाची आता सोशल मीडियावर चर्चा होतीये. काल म्हणजे शुक्रवारी अकलूज-वेळापूर रोडवरील गलांडे हॉटेल येथे हा अनोखा विवाह संपन्न झालाय.

हे सुद्धा वाचा

मुंबईच्या कर्फ्युबाबत मोठी अपडेट, विश्वास नांगरे पाटील म्हणाले..

Photo : भाग्यश्री मोटेचा ‘एकदम कडक’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला, ग्लॅमरस फोटोंवर चाहते होतात फिदा

भारतीय नौदल कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्यास सज्ज : व्हाईस अ‍ॅडमिरल अजेंद्र बहादुर सिंग

अतुल हा सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील असून त्याचा मुंबई येथे ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. तर कांदिवली मधील उच्चशिक्षित पिंकी आणि रिंकी या जुळ्या बहिणी आहेत. सहा महिन्यांपूर्वी पिंकी, रिंकी आणि त्यांची आई आजारी पडल्यानंतर अतुल नावाच्या टॅक्सी ट्रॅव्हल करणाऱ्या युवकाने रुग्णालयात त्यांची काळजी घेतली होती. यातून त्यांचे प्रेम जुळले आणि नातेवाईकांच्या संमतीने काल हा विवाह अकलूज मध्ये पार पडला.

इंजिनीअर पदावर कार्यरत असणाऱ्या रिंकी आणि पिंकी जुळ्या बहिणी आहेत. या दोघींचं शिक्षण एकत्रित झालं. त्यानंतर एकाच आयटी कंपनीत नोकरीला देखील लागल्या. लहानपणापासूनच या दोघी एकमेकींसोबत वाढल्या. दोघींनाही एकमेकींची एवढी सवय झाली की त्यांनी एकाच वरास जीवनसाथी म्हणून निवड करून त्याच्यासोबत सप्तपदी घेतली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी