34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रहुतात्मा दिनानिमित्त पाळू दोन मिनिटांचे मौन...

हुतात्मा दिनानिमित्त पाळू दोन मिनिटांचे मौन…

30 जानेवारी रोजी 2 मिनिटांसाठी मौन पाळून हुतात्मा दिन साजरा करण्याचे निर्देश शासनातर्फे देण्यात आले आहेत.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्मांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी 30 जानेवारीला संपूर्ण देशभरात हुतात्मा दिन (shahid din) साजरा केला जातो. याच अनुषंगाने देशभरात हुतात्मा दिनानिमित्त 30 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजल्यापासून दोन मिनिटांचे मौन पाळण्यात येणार आहे. हुतात्मा दिनानिमित्त सोमवारी राज्यातील सर्व शाळा कॉलेजांसह सरकारी कार्यालयामध्ये दोन मिनिटांचे मौन पाळण्याचे आदेश राज्य सरकारने शुक्रवारी जारी केले आहेत. (Two minutes of silence will be observed on Martyrs’ Day)

देशासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाबद्दल शहिद झालेल्या लोकांच्या स्मरणार्थ हे दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळले जातात. राष्ट्रीय स्तरावर हा दिवस सर्वोदय दिन म्हणून देखील ओळखला जातो. ज्यामध्ये 23 मार्च आणि 30 जानेवारी हे मुख्यता: पुर्ण देशभर शहीद दिवस म्हणून पाळले जातात. सोमवारी, सकाळी 11 ते 11 वाजून 02 मिनिटापर्यंत मौन पाळून हुतात्मा दिन साजरा करण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयाद्वारे देण्यात आले आहेत.

हे सुद्धा वाचा : Republic day 2023 : प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलचे खास डूडल; पाहा गुजरातच्या देशप्रेमीची कलाकृती

हुकूमशहांच्या हातात देशाचे प्रजासत्ताक; या दडपशीलाच ‘लोकांचे राज्य’ म्हणायचे का? नरेंद्र मोदी उत्तर द्या!

यंदा भारत होणार जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश; गेल्या 60 वर्षात प्रथमच घटली चीनची लोकसंख्या!

या दिवशी संपूर्ण देशभर दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून आदरांजली वाहण्यात येते. त्यानुसार यंदाही राज्यभरात दोन मिनिटे मौन पाळण्याची सूचना या जीआरद्वारे देण्यात आली आहे. त्यासाठी राज्यातील निमशासकीय, शासकीय, आस्थापन, शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठात सोमवारी ठीक 10.59 मिनिटे ते 11 वाजेपर्यंत भोंगा वाजविण्यात येईल. त्यानंतर या सर्व ठिकाणावरील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून मौन पाळण्याचे आदेश देण्यात आले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयानुसार दोन मिनिटे मौन पाळल्यानंतर 11 वाजून 2 मिनिटाला पुन्हा भोंग वाजवून मौन संपल्याविषयीचा इशारा देण्यात येईल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी