22 C
Mumbai
Saturday, December 10, 2022
घरमहाराष्ट्रUber taxi : उबेर टॅक्सी चालकाच्या बेजबाबदारपणामुळे विमान चुकले; कोर्टाने कंपनीला ठोठावला...

Uber taxi : उबेर टॅक्सी चालकाच्या बेजबाबदारपणामुळे विमान चुकले; कोर्टाने कंपनीला ठोठावला दंड

टॅक्सीची सेवा व्यवस्थीत न दिल्यामुळे उबर कंपनीला ग्राहक न्यायालयाने दणका दिला आहे. मुंबईत एका महिला प्रवाशाला वेळेत विमानतळावर न पोहचवल्यामुळे ग्राहक न्यायालयाने कंपनीला दोषी मानत पीडित महिला प्रवाशाला मानसिक त्रास झाल्याबद्दल 10 रुपयांची भरपाई आणि कायदेशीर कारवाईच्या नुकसानभरपाईपोटी 10 हजार असे एकुण 20 हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.

टॅक्सीची सेवा व्यवस्थीत न दिल्यामुळे उबर कंपनीला ग्राहक न्यायालयाने दणका दिला आहे. मुंबईत एका महिला प्रवाशाला वेळेत विमानतळावर न पोहचवल्यामुळे ग्राहक न्यायालयाने कंपनीला दोषी मानत पीडित महिला प्रवाशाला मानसिक त्रास झाल्याबद्दल 10 रुपयांची भरपाई आणि कायदेशीर कारवाईच्या नुकसानभरपाईपोटी 10 हजार असे एकुण 20 हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. डोंबिवली येथे राहणाऱ्या कविता शर्मा यांना 12 जून 2018 रोजी विमानतळावरून विमान पकडण्यासाठी दुपारी 3 वाजून 29 मिनिटांनी उबेर टॅक्सी बुक केली होती. त्यांचे विमान सायंकाळी साडेपाच वाजता सुटणार होते. कविता शर्मा यांनी आरोप केला होता की, उबेर चालकाला वारंवार फोन करुन देखील चालक त्यांना घेण्यासाठी 14 मिनीटे उशीरा पोहचला. त्यानंतर सीएनजी भरण्यासाठी चालकाने सीएनजी स्टेशनवर 15 ते 20 मिनीटे वेळ घालवला. या सगळ्या गोंधळामुळे कविता शर्मा यांना विमानतळावर पोहचण्यासाठी उशीर झाला आणि त्यांचे विमान चुकले.
– महिलेची ग्राहक न्यायालयात धाव
कविता शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, चालक जेव्हा त्यांना घेण्यासाठी पोहचला तेव्हा तो फोनवर कोणाशीतरी बोलत होता. जेव्हा त्याचे बोलणे संपले तेव्हा त्याने टॅक्सी चालवणे सुरू केले. जेव्हा मी विमानतळावर पोहचल्या तेव्हा 5 वाजून २३ मिनेटे झाली होती आणि माझे विमान सुटले होते. एवढेच नाही तर जेव्हा मी टॅक्सी बुक केली होती तेव्हा 563 रूपये टॅक्सी भाडे सांगितले होते, मात्र टॅक्सीतून उतरल्यानंतर चालकाने 703 रूपये टॅक्सीभाडे घेतले. त्यानंतर कविता शर्मा यांनी ट्विटरव्दारे उबेरकंपनीकडे तक्रार देखील केली होती. त्यानंतर कंपनीने त्यांना 139 रुपये परत केले होते. दरम्यान या सगळ्या त्रासामुळे कविता शर्मा यांनी ग्राहक न्यायालयात देखील तक्रार दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने कंपनीला नोटीस पाठवली होती. या प्रकरणी उबेर कंपनीकडून चालकाच्या चुकीसाठी कंपनी जबाबदार नाही असे न्यायालयात सांगण्यात आले.
— हे सुद्धा वाचा :
Salman Khan : ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’ सलमानला राहण्यासाठी असुरक्षित! मुंबई महापालिकेचा अहवाल
IPS : आयपीएस रश्मी शुक्ला यांच्यासाठी आता दिल्लीतून हालचाली?; वाचा काय आहे कारण…
Mumbai News : दिवाळीची मिठाई खरेदी करताना लागला 2.4 लाखांचा चुना! मुंबईतील घटना
— तुम्ही जबाबदारी झटकून देऊ शकत नाही
तसेच कंपनीने असा देखील दावा केला की, चालक ना आमचा कर्मचारी आहे, ना आमच्या कोणत्या कंपनीचा. त्यावर ग्राहक न्यायालय आपल्या आदेशात म्हणाले की, ज्या मोबाईल अॅप्लिकेशनवरून ही टॅक्सी सेवा बुक केली जाते ती कंट्रोल करण्याचे काम उबेर कंपनी करते. तक्रारदाराने उबेर कंपनीच्या याच अॅपव्दारे टॅक्सी बुक केली आणि पैसे दिले, पीडित महिलेने चालकाला पैसे दिले नव्हते, त्यामुळे तुम्ही जबाबदारी झटकून देऊ शकत नाही. असे सुनावत न्यायालयाने पीडित महिलेला नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!