29.9 C
Mumbai
Saturday, March 18, 2023
घरमहाराष्ट्रउदय सामंत यांचा भन्नाट उपक्रम, युवकांसाठी आणली नवी मोहीम

उदय सामंत यांचा भन्नाट उपक्रम, युवकांसाठी आणली नवी मोहीम

शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर सरकारने तरुणांना रोजगार देण्यासंबंधी पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच दोवोस येथे सरकारने विविध कंपन्यांसोबत १ लाख ४० हजार कोटींचे सामंजस्य करार केले असून उद्योग, आणि रोजगारवाढीसाठी (employment) सरकार प्रयत्न करत आहे. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी देखील तरुणांना रोजगार मिळावेत यासाठी भन्नाट उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी युवकांसाठी नवी मोहीम आणली आहे. (Uday Samant initiative create employment across the maharashtra)

राज्यातील तरुणांच्या हाताला काम मिळावे, त्यांना नोकऱ्या मिळाव्यात यासाठी उद्योग विभागाने आता पुढाकार घेतला आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या काही काळात आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावे घेण्यात येणार आहेत. येत्या १२ फेब्रुवारीपासून रत्नागिरी जिल्ह्यातून या रोजगार मेळाव्याचा प्रारंभ करण्यात येणार आहे, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्र्यांनी दावोसमध्ये दुप्पट वेगाने काम केले : उद्योग मंत्री उदय सामंत

महाराष्ट्रात ३०० कोटींची गुंतवणूक होणार; मंत्री उदय सामंत यांचा जर्मनी दौरा यशस्वी

बाळासाहेब भवनमध्ये भरला उदय सामंत यांचा जनता दरबार!

राज्यातील पहिला रोजगार मेळावा रत्नागिरी येथे होणार आहे. शिर्के महाविद्यालयात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात सुमारे पाच हजार तरुण सहभागी होण्याची शक्यता असून त्यापैकी सुमारे दोन हजार जणांना तत्काळ रोजगार देण्यासंबंधी प्रयत्न केले जाणार आहेत. या मेळाव्यासाठी राष्ट्रीय, बहुराष्ट्रीय तसेच स्थानिक कंपन्या सहभागी होणार आहेत. वय १८ वर्षे व पाचवी ते पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या सर्व घटकांना या मेळाव्यातून रोजगार दिला जाईल, असे उद्योगमंत्री सामंत यांनी स्पष्ट केले. रत्नागिरी जिल्ह्यानंतर राज्याच्या इतर जिल्ह्याता रोजगार मेळाव्या घेण्याचे उद्योग विभागाने निश्चित केले आहे. त्यानुसार सर्व जिल्ह्यात हे मेळावे होणार आहेत. अधिकाधिक तरुणांना रोजगाराची संधी याद्वारे दिला जाणार आहे.

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी