26 C
Mumbai
Sunday, September 17, 2023
घरमहाराष्ट्रउदय सामंतांनी मांडले विधेयक, उद्योगवाढीसाठी खमके धोरण !

उदय सामंतांनी मांडले विधेयक, उद्योगवाढीसाठी खमके धोरण !

राज्यामध्ये गुंतवणुक करणे सोपे व्हावे यासाठी सरकारने गुंतवणूकदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी २०१४ मध्ये महाराष्ट्र उद्योग, व्यापार व गुंतवणूक सुविधा कक्ष ( मैत्री) उभारला आहे. सरकारने मैत्री याचे राज्य एक खिडकी प्रणाली म्हणून रूपांतर केले आहे. या बाबतचे विधेयक आज उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान सभेत मांडले.

राज्य एक खिडकी प्रणाली म्हणून प्रभावीपणे करू करण्याच्या दृष्टीने मैत्री अतिरिक्त अधिकार प्रदान करणे गरजेचे आहे. या खिडकीचे अनेकविध फायदे आहेत. राज्यात गुंतवणूकदार व उद्योजक यांना प्राधान्य देणारे वातावरण निर्माण केल्यामुळे केवळ राज्याच्या अर्थ व्यवस्थेला चालना मिळणार नाही तर, देशातील आणि परकीय गुंतवणुकीसाठी राज्य सर्वाधिक पसंतीचे ठिकाण बनण्याचे सुनिश्चित होण्याबरोबरच विविध क्षेत्रांमध्ये नोकऱ्या निर्माण करण्यास देखील मदत होणार आहे. असे या विधेयकात नमूद करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

मुंबईत 22,483 कुटूंबे धोकादायक स्थितीत; 12 वर्षांपासून दरडी कोसळण्याच्या दुर्घटनांवर उपाययोजना नाही

धनंजय मुंडेंनी शेतकऱ्यांसाठी आणला भन्नाट उपक्रम !

खारघर दुर्घटना: एक सदस्य समितीला मुदतवाढ; मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

फॉक्सकाँन आणि अन्य उद्योग गुजरातने पळवल्यावर विरोधकानी शिंदे सरकारवर टीका केली होती. त्यामुळेच की काय सरकारने तातडीने हे विधेयक विधिमंडळ पटलावर ठेवल्याचे बोलले जाते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी