28 C
Mumbai
Friday, December 8, 2023
घरमहाराष्ट्रदेशाची वाट लागली, तसे कुटुंबही उद्ध्वस्त होणार - उदयनराजेन

देशाची वाट लागली, तसे कुटुंबही उद्ध्वस्त होणार – उदयनराजेन

सर्वधर्मसमभावाची राज्यकर्त्यांनी व्याख्या बदलून टाकली, हे घातक आहे. जेव्हा तुकडे होतील तेव्हा प्रत्येकाला त्याची किंमत मोजावी लागेल. जशी देशाची वाताहत होईल तशी आपल्या कुटुंबाची देखील वाताहत होणार असल्याचा इशारा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिला.

आज सर्वधर्मसंकल्पनेचा विसर पडत चालला आहे. त्यामुळे समाजात तेढ वाढत चालली आहे. शिवाजी महाराजांना वाटले असते राजेशाही ठेवावी तर आज आपल्याकडे राजेशाही असती. शिवाजी महाराज नसते, तर लोकशाहीचे तुकडे व्हायला किती वेळ लागला असता असे सांगतानाच, सर्वधर्मसमभावाची राज्यकर्त्यांनी व्याख्या बदलून टाकली, हे घातक आहे. जेव्हा तुकडे होतील तेव्हा प्रत्येकाला त्याची किंमत मोजावी लागेल. जशी देशाची वाताहत होईल तशी आपल्या कुटुंबाची देखील वाताहत होणार असल्याचा इशारा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिला.

साताऱ्यामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या 273 व्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उदयनराजे भोसले बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचा विचार जास्तीत जास्त लोकांमध्ये रुजवला पाहिजे. ही आताची गरज आहे, असे आवाहन देखील केले.

यावेळी बोतलाना उदयनराजे यांनी घराणेशाहीवर देखील घणाघात केला, ते म्हणाले घराणेशाहीमुळे विकेंद्रीकरण झाले नाही, केवळ भाषणातच विकेंद्रीकर आता राहिले आहे. हे केंद्रीकरण असेच राहिल्यास देशाचे 29 तुकडे होण्यास वेळ लागणार नाही असा इशारा देतानाच ते म्हणाले आज देशाचे तुकडे करण्याचा काही लोकांनी विडा उचलला आहे. त्यांचा विचार हाणून पाडला पाहिजे. आपण म्हणतो आहे 21 व्या शतकात आहे. आपण प्रगती करतो आहोत पण आज वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक एकमेकांशी बोलत नाहीत. मग ही  प्रगती आहे का? देशाची प्रगती म्हणजे काय? प्रत्येकाची प्रगती म्हणजे देशाची प्रगती. राज्याची प्रगती म्हणजे देशाची प्रगती. जर प्रगती करायची असेल तर शिवाजी महाराजांच्या विचाराने जावे लागेल, असे आवाहन देखल केले.

हे सुद्धा वाचा
चिनी सैनिक घुसखोरी करतात ते चुकीचेच पण, भारतीय सैनिक सुद्धा तेच करतात; भालचंद्र नेमाडे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

विजय सेतुपतीने एका महिन्यात इतके वजन कमी केले की चाहत्यांना ओळखणे झाले कठीण

अखलाखच्या मॉबलिंचिंगच्या घटनेनंतर देशभरात पुरस्कार वापसीची चळवळ सुरू झाली, त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात; ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’वरून अजित पवार यांची सरकारवर परखड टीका

आज जगात सांगावं लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण आहेत. त्यांचा विचार घेऊन अनेक चळवळी उभा राहिल्या. थोर महापुरुष होते म्हणून आज लोकशाही आहे. मात्र थोर पुरुषांची बदनामी करणाऱ्यांच्या विकृतीत वाढली आहे. शिवाजी महाराजांच्या विचारांचा विसर पडत चालला असून केवळ स्वार्थापोटी तेढ निर्माण केली जात आहे, अशी खंत देखील खासदार उदयनराजे भोसले यांनी यावेळी व्यक्त केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी