26 C
Mumbai
Saturday, September 28, 2024
Homeमहाराष्ट्रराजघराण्यातील समाध्यांच्या संवर्धनाबाबत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांना भेटणार : छ. उदयनराजे...

राजघराण्यातील समाध्यांच्या संवर्धनाबाबत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांना भेटणार : छ. उदयनराजे भोसले

माहुली येथे राजघरण्यातील अनेक इतिहास प्रसिद्ध व्यक्तींच्या समाधी आहेत. या समाधी संवर्धनाच्या संदर्भात राज्य शासनाने ठोस भूमिका जाहीर करावी, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा इतिहास पुढच्या पिढीला माहीत व्हावा याकरिता ही समाधी स्थळे स्फूर्तीस्थळे ओळखली जावीत, अशी अपेक्षा खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली. राजघराण्यातील समाध्यांच्या संवर्धनाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुद्धा या मागण्या संदर्भात लवकरच भेटून चर्चा करणार असल्याचे उदयनराजे यांनी स्पष्ट केले.

माहुली येथील महाराणी येसूबाई यांच्या समाधीची खासदार उदयनराजे भोसले यांनी सोमवारी सकाळी पाहणी केली यावेळी महाराणी येसूबाई फैंडेशन चे सर्वेसर्वा माजी उपनगराध्यक्ष सुहास राजे शिर्के, माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, ,जिज्ञासा मंचचे निलेश पंडित, समाधी स्थळाचे पुजारी जयवंत सपकाळ, सर्जेराव सपकाळ सुधाकर देसाई, सरपंच प्रवीण शिंदे, उपसरपंच अविनाश कोळपे, प्रकाश माने, राहुल शिवनामे, सचिन बागल व सर्व ग्रामस्थ इत्यादी यावेळी उपस्थित होते.

खासदार उदयनराजे भोसले यांनी येसूबाईंच्या समाधीचे दर्शन घेऊन त्याला अभिवादन केले त्यानंतर उदयनराजे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले आजच्या 21 व्या शतकामध्ये प्रचंड स्पर्धा वाढली आहे. तरुणांना जीवनामध्ये यशस्वी होण्याकरिता छत्रपती शिवराय, धर्मवीर संभाजी महाराज यांच्या इतिहासापासून प्रेरणा मिळावी, तो इतिहास त्यांच्या नजरेसमोर राहावा कर्तुत्वाच्या त्यांच्या गाथेतून तरुणांनी बोध घ्यावा. याकरिता अशा समाध्यांचे संवर्धन होणे आणि ती क्षेत्रे स्फूर्ती क्षेत्रे म्हणून गणली जाणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. राज्य शासनाने छत्रपती शिवराय आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या समाधी संदर्भात तसेच राजघराण्यातील येथील ज्या समाधी आहेत, त्या दृष्टीने एक ठोस कृती आराखडा जाहीर करावा.

हे सुद्धा वाचा

हसन मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला 

अभिनेता सलमान खान याला धमकी देणारा बालक पोलिसांच्या ताब्यात  

वनमंत्री मुनगंटीवार यांनी घडविला चमत्कार; महाराष्ट्रात वाघांची संख्या ४०० च्या पार !

येसूबाई यांच्या समाधी संदर्भात पुरातत्त्व विभागाचे अधिकारी जिल्हा प्रशासनाचे मुख्य जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी तसेच संबंधित विभागाचे जबाबदार विभाग प्रमुख यांच्याशी तातडीने चर्चा करून या समाधी स्थळाचा विकास कसा करता येईल, या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुद्धा या मागण्या संदर्भात लवकरच भेटून चर्चा करणार असल्याचे उदयनराजे यांनी स्पष्ट केले.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी