30 C
Mumbai
Friday, May 12, 2023
घरमहाराष्ट्रPHOTO : उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी घेतली दाऊदी बोहरा समाजाच्या धर्मगुरूंची...

PHOTO : उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी घेतली दाऊदी बोहरा समाजाच्या धर्मगुरूंची भेट

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी मुंबईतील दाऊदी बोहरा समाजाचे धर्मगुरू सैयदना मुफद्दल सैफुद्दिन यांची भेट घेतली. (Uddhav Thackeray, Aditya Thackeray met Dawoodi Bohra religious leaders)

Uddhav Thackeray, Aditya Thackeray met Dawoodi Bohra religious leaders

यावेळी आदित्य ठाकरे देखील सोबत होते. तीन दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर असताना त्यांनी बोहरा समाजाच्या शैक्षणिक संकुलाचे उद्घाटन केले होते.

Uddhav Thackeray, Aditya Thackeray met Dawoodi Bohra religious leaders

यावेळी उद्धव ठाकरे यांनी दाऊदी बोहरा समाजाने मरोळ येथे उभारलेल्या संकुलाबद्दल कोतुक केले. मुंबईतील एक प्रभावी अल्पसंख्यांकांपैकी दाऊदी बोहरा समाज आहे, मोदींनी मुंबई दौऱ्यात या समाजाचे कौतुक केले होते. त्यानंतर आज ठाकरे यांनी देखील दाऊदी बोहरा समाजाच्या धर्मगुरूंची भेट घेतली.
Uddhav Thackeray, Aditya Thackeray met Dawoodi Bohra religious leaders

बोहरा समाजाचे लोक सामान्य मुस्लिमांपेक्षा थोडे वेगळे आहेत. बोहरा समाजाची लोकसंख्या जवळपास २० लाखांहून अधिक अधिक असल्याचे सांगितले जाते. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, कोलकाता, चेन्नई तसेच परदेशात देखील या समाजाचे लोक राहतात.
Uddhav Thackeray, Aditya Thackeray met Dawoodi Bohra religious leaders

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील याच अकादमीच्या उद्घाटनाला आले होते, त्यावरून उध्दव ठाकरे यांनी मोदी आणि भाजपवर टीका देखील केली होती.
Uddhav Thackeray, Aditya Thackeray met Dawoodi Bohra religious leaders
त्यावेळी ठाकरे म्हणाले होते, बोहरा समाजाच्या विरोधात मी नाही, ते चांगले लोक आहे. मी तेथे गेलो असतो आणि त्यांना चांगले म्हटले असते तर मी हिंदुत्व सोडले अशी टीका झाली असती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी