28 C
Mumbai
Sunday, September 4, 2022
घरमहाराष्ट्रUddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांचे लवकरच राज्यभर 'महाप्रबोधन'

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांचे लवकरच राज्यभर ‘महाप्रबोधन’

उद्धव ठाकरे यांच्या या महाप्रबोधन यात्रेने महाराष्ट्रातील सत्ताकारणाची समीकरणे बदलतील का, शिवसैनिकांमध्ये पुन्हा नव्याने चैतन्य संचारेल का, शिंदेगटातील मंत्र्यांची काय प्रतिक्रिया येईल हे सारेच पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि इतर शिवसेनेचे आमदार, खासदार यांनी शिवसेनेविरोधातच बंड पुकारले आणि भाजपच्या पंक्तीत जाऊन बसले. वेगळा शिंदे गट स्थापन केल्यानंतर आपलीच खरी शिवसेना म्हणून प्रचारास सुरवात झाली यामध्ये अनेकांनी थेट शिवसेनेला रामराम करीत शिंदे गटात जाणे पसंत केले. या संपुर्ण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांमध्ये पुन्हा एकदा जोश निर्माण करण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिवसंवाद यात्रा सुरू करत अवघा महाराष्ट्र पिंजून काढण्यास सुरूवात केली. दरम्यान आता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सुद्धा सार्वजनिक गणेशोत्सवचा सण पार पडल्यानतर महाराष्ट्रभर दौरा करणार आहेत, यावेळी त्यांना मिळणारा जनसामान्यांचा, शिवसैनिकांचा प्रतिसाद लक्षवेधी ठरणार आहे.

उद्धव ठाकरे लवकरच ‘महाप्रबोधन’ यात्रेला सुरूवात करणार असून राज्यातील प्रत्येक कानाकोपऱ्यात हा दौरा पोहोचणार आहे. या दौऱ्याची सुरूवात शिवसेनेचा बालेकिल्ला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ ठाण्यातून होणार आहे, तर या दौऱ्याची सांगता कोल्हापुरातील  बिंदू चौक येथे होणार आहे. कोल्हापूर आणि बिंदू चौक हे ऐतिहासिकदृष्ट्या घनिष्ट असे नाते आहे. हा चौक अनेक मोठमोठ्या नेत्यांच्या सभेचा अजूनही साक्षीदार आहे. दरवेळी बाळासाहेब आपल्या प्रचाराचा नारळ या चौकातूनच फोडत असत, पण यावेळी उद्धव ठाकरे आपल्या दौऱ्याची सांगता या चौकात करणार आहेत, त्यामुळे यावर सध्या उलट सूलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

हे सुद्धा वाचा…

Maharashtra Assembly Session : ‘मुख्यमंत्री घेतात नाव शिवसेनेचे आणि निर्णय राबवतात भाजपचे’

Chhagan Bhujbal :छगन भुजबळ यांनी डासांवरुन तानाजी सावंत यांना चांगलेच कोंडीत पकडले

Supreme Court : मुंबई महानगरपालिका निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाने घेतला मोठा निर्णय

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या या महाप्रबोधन यात्रेने महाराष्ट्रातील सत्ताकारणाची समीकरणे बदलतील का, शिवसैनिकांमध्ये पुन्हा नव्याने चैतन्य संचारेल का, शिंदेगटातील मंत्र्यांची काय प्रतिक्रिया येईल हे सारेच पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी