28 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रUddhav Thackeray : 'त्याला पुन्हा एखाद्या खोट्या प्रकरणात गोवलं जाऊ शकतं'; उद्धव...

Uddhav Thackeray : ‘त्याला पुन्हा एखाद्या खोट्या प्रकरणात गोवलं जाऊ शकतं’; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली भीती

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांना पुन्हा एखाद्या खोट्या प्रकरणात गोवलं जाऊ शकतं, अशी भीती व्यक्त केली आहे. ते मातोश्रीवर (Matoshree) घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांना पुन्हा एखाद्या खोट्या प्रकरणात गोवलं जाऊ शकतं, अशी भीती व्यक्त केली आहे. ते मातोश्रीवर (Matoshree) घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. संजय राऊत यांनी जामीन मिळाल्यानंतर मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीने संजय राऊत यांनी अटक केली होती. तब्बल 101 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर संजय राऊत यांनी अखेर बुधवारी जामीन मिळाला होता. बुधवारीच संजय राऊत यांची आर्थर रोड जेलमधून सुटका झाली होती. दरम्यान, कालच ते उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता होती. मात्र त्यांनी अखेर आज दुपारी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, ‘संजय राऊत माझा जीवलग मित्र आहे. तो शिवसेनेसाठी लढला आणि लढतो आहे. आता त्याला जामीन मिळाला आहे. न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला. विरोधक आताही शांत बसणार नाही.’ संजय राऊत यांना खोट्या केसेसमध्ये पुन्हा अटकवलं जाऊ शकतं उद्धव ठाकरे केला आहे. मातोश्रीवर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये त्यांनी हे आरोप केले आहेत.

हे सुद्धा वाचा

Bank Strike : पुढच्या आठवड्यात बँकिंग सुविधा पडणार ठप्प! बँक कर्मचाऱ्यांचा संप

Bollywood Updates : एकता आणि रिया कपूर यांच्या आगामी ‘द क्रू’साठी तब्बू, करीना कपूर आणि क्रिती सेनन एकत्र

IND vs ENG : सेमी फायनल सामन्यांत रोहित खेळणार की नाही? स्वतः दिली मोठी अपडेट

संजय राऊत संकटात लढणारा धाडसी मित्र
उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणावर निशाणा साधला. संजय राऊत हा शिवसेना नेता आहे, खासदार आहे, सामनाचा कार्यकारी संपादक आहे आणि माझा जिवलग मित्र आहे. मित्र तोच असतो, जो संकटाच्या काळात न डगमगता लढतो. संकटासोबत राहून संजय लढतोय. काल न्यायालयाच्या निकालामुळे सगळं स्पष्ट झालं आहे. मी न्यायदेवतेचे आभार मानतो. या निकालात न्यायालयाने स्पष्ट निरीक्षण नोंदवली आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा केंद्र सरकारच्या पाळीव प्राण्याप्रमाणे वागतायत हे स्पष्ट आहे. बेकायदेशीरपणे केंद्रीय यंत्रणांचा वापर सुरु आहे.

हायकोर्टाने संजय राऊत यांची अटक बेकायदेशी असल्याचं परखड निरीक्षण बुधवारी नोंदवलं होतं. यावर उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, एवढ्या चपराकी लाज वाटण्यासारख्या आहेत. केंद्रात भाजपाचं सरकार नसतं तर अशा घटना घडल्या नसत्या. कर नाही त्याला डर कशाला, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना यावेळी सुनावलंय.

संजय राऊत यांना गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणी गोवण्यात आलं असल्याचा आरोप याआधीही शिवसेनेकडून करण्यात आला होता. फक्त ईडीच नव्हे तर वेगवेगळ्या केंद्रीय तपास यंत्रणा केंद्र सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोपही राऊतांनी वेळोवेळी केला होता. दरम्यान, आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर निशाणा साधलाय.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी