30 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रUddhav Thackeray : उद्धव ठाकरे म्हणाले, आदित्यच्या दौऱ्यांना चांगला प्रतिसाद; मी सुद्धा...

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे म्हणाले, आदित्यच्या दौऱ्यांना चांगला प्रतिसाद; मी सुद्धा महाराष्ट्र पिंजून काढणार

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आता आक्रमक झाले आहेत. आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटाच्या विरोधात राज्यभरात रान पेटवले आहे. ती ज्योत आता आणखी पेटती ठेवण्याचा चंग शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बांधला आहे.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आता आक्रमक झाले आहेत. आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटाच्या विरोधात राज्यभरात रान पेटवले आहे. ती ज्योत आता आणखी पेटती ठेवण्याचा चंग शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बांधला आहे. राज्यभरात उद्धव ठाकरे सुद्धा दौरे काढणार आहेत. आदित्य ठाकरे यांनी काढलेल्या सध्याच्या दौऱ्यांना जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, पुणे आणि उत्तर महाराष्ट्रातील दौऱ्यांमध्ये आदित्य ठाकरे यांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचे भविष्यातील दौरे बंडखोरांसाठी आणखी डोकेदुखी ठरतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष व राज ठाकरे यांचे माजी सहकारी राजन राजे आपल्या कार्यकर्त्यांसह नुकतेच गेले होते. राजन राजे यांच्या जवळ उद्धव ठाकरे यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखविली. एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी राजे यांच्याजवळ महत्वाचे विधान केले. ‘सध्याचे राजकारण हे विश्वासघातकी व खालच्या पातळीवर गेले आहे. त्यासाठी शहरी व ग्रामीण भागात जावून जनजागृती करणे गरजेचे आहे, असे ठाकरे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

एकनाथ शिंदेंनी केल्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

Cabinet Expansion : उतावळ्या बंडखोरांना लांबलेला मंत्रिमंडळ विस्तार सोसवेना !

Cabinet Expansion : ‘मंत्रीमंडळ विस्ताराला यश मिळण्यासाठी कामाख्या देवीला 40 रेड्यांचा बळी द्या’

सध्या आदित्य महाराष्ट्रभर फिरतोय, आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळतोय. आपणही एकत्र येवून महाराष्ट्र पिंजून काढूया, अशी भावना उद्धव ठाकरे यांनी राजन राजे यांच्याजवळ बोलून दाखविली. यावेळी राजन राजे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम करण्याची इच्छा बोलून दाखविली. त्यावर ‘आपण एकत्र काम करूयात. महाराष्ट्राला त्याची गरज आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. उत्कर्षाच्या काळात सगळेच जवळ येतात. पण तुम्ही शिवसेनेच्या अडचणीच्या काळात जवळ आलात, अशा शब्दांत ठाकरे यांनी राजन राजे यांच्याविषयी आभार व्यक्त केले.

तळागाळातील नेत्यांची मोठ बांधण्याचा ठाकरे यांचा प्रयत्न
राजकीय महत्वकांक्षा असलेले अनेक आमदार – खासदार उद्धव ठाकरे यांना सोडून गेले. पण जनतेसाठी तळागाळात काम करणारे अनेक नेते उद्धव ठाकरे यांच्या पाठी उभे राहिले आहेत. सुषमा अंधारे, लक्ष्मण हाके व आता राजन राजे असे अनेकजण उद्धव ठाकरे यांच्या सोबतीला आले आहेत. गोरगरीब व सामान्य लोकांसाठी लढे देणारे चळवळीतील असे कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांना येवून मिळत आहेत. त्यामुळे ठाकरे यांची भविष्यात आणखी ताकद वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी