29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रसत्तासंघर्षाच्या सुनावणीला वेग; निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उद्या सुनावणी

सत्तासंघर्षाच्या सुनावणीला वेग; निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उद्या सुनावणी

राज्याच्या सत्तासंघर्षाच्या (Maharashtra Power Struggle) सुनावणीला आता सर्वोच्च न्यायालयात वेग आला आहे. मंगळवारी (दि.२१) रोजी सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायमुर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी ठाकरे गटाकडून (Uddhav Thackeray vs Eknath Shinde) ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद केला. तर उद्या ठाकरे गटाचे अभिषेक मनू सिंघवी हे युक्तीवाद करणार असून तिसऱ्या दिवशी शिंदे गटाकडून युक्तीवाद करण्यात येणार आहे. आजच्या युक्तीवादादरम्यान सिब्बल यांनी जोरदार युक्तीवाद करत, १६ आमदारांची अपात्रता, विधानसभा अध्यक्ष निवड, घटनेतील १० वी सुची, पक्षाचा व्हिप, राज्यपालांची कृती अशा विविध मुद्द्यांवर जोरदार युक्तीवाद केला. (Uddhav Thackeray vs Eknath Shinde Maharashtra Power Struggle Hearing Speeds Up; Hearing tomorrow on the Election Commission’s decision)

सुनावणी दरम्यान कपिल सिब्बल यांनी १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याची मागणी केली. यावेळी विधानसभा अध्यक्ष देखील अपात्रतेचा निर्णय देऊ शकतात असे त्यांनी म्हटले. तसेच सर्वोच्च न्यायालय देखील अपात्रतेचा निर्णय घेऊ शकते असे निदर्शनास आणून दिले, यावेळी घटनापीठाने अपात्रतेचे अधिकार विधानसभा अध्यक्षांना असल्याचे सांगितले. या खटल्याची क्लिष्टता २७ जून रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे वाढली असल्याचे सिब्बल म्हणाले. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळांना न्यायालयाच्या त्यावेळच्या निर्णयामुळेच त्यावेळी निर्णय घेता आला नाही, असा युक्तीवाद यावेळी सिब्बल यांनी केला. कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद करताना विधानसभा अध्यक्षांकडे १६ आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण पाठवून 7 दिवसांत निकाल लावण्याची मागणी देखील केली. तसेच अध्यक्ष जो निर्णय देतील त्या निर्णयावर देखील सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होऊ शकते असा युक्तीवाद त्यांनी यावेळी केला.

विधानसभा अध्यक्षांच्या निवडीवर देखील यावेळी युक्तीवाद झाला. यावेळी सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्षांना बहूमतासाठी एक मत कमी पडल्याचे सिब्बल यांनी युक्तीवादादरम्यान सांगितले. दरम्यान या प्रकरणाची क्लिष्टता वाढल्यामुळे घटनापीठासमोर देखील पेच निर्मान झाला आहे. सिब्बल यांनी घटनेतील १० व्या सुचीनुसार पक्षात जर दोन तृतियांश फुट पडली असेल तर त्या फुटलेल्या सदस्यांचे इतर पक्षामध्ये विलीनीकरण होणे आवश्यक असल्याचा युक्तीवाद केला. विधीमंडळ पक्ष आणि विधीमंडळाबाहेरील राजकीय पक्ष यावर देखील सिब्बल यांनी यावेळी युक्तीवाद केला. मुळ राजकीय पक्ष हा विधीमंडळाबाहेरचा असल्याचे सिब्बल म्हणाले. पक्षाचा प्रतोद देखील पक्ष प्रमुखच करु शकतात विधीमंडळातील पक्ष प्रतोद नियुक्त करु शकत नाही असे ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा 
नवाब मलिक खरच आजारी आहेत का; मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल

किशोरी पेडणेकर यांना एसआरए घोटाळा प्रकरणात दिलासा; उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले ‘हे’ आदेश

‘शिवसेना, पक्षचिन्हा’बाबत ठाकरे गटाची पुढील भूमिका काय? सर्वोच्च न्यायालयात जाणार खटला; वाचा सविस्तर

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर देखील यावेळी सिब्बल यांनी सवाल उपस्थित केले. पक्षाचे नाव आणि पक्ष चिन्ह संख्याबळाच्या जोरावर कसे देऊ शकतात असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. जर आमदार अपात्र ठरले, घटनापीठाचा निकाल शिंदे गटाच्या विरोधात लागला तर पक्षाचे नाव आणि पक्षचिन्हाचे काय होणार असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. दरम्यान बुधवारी (२२) रोजी ठाकरे गटाकडून विधिज्ञ सिब्बल, देवदत्त कामत, सिंघवी युक्तीवाद करणार आहेत. यावेळी निवडणूक आयोगाच्या निकालावर देखील सुनावणी पार पडणार आहे. तर गुरुवारी शिंदे गटाकडून युक्तीवाद केला जाणार आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी