30 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रUddhav Thackeray : 'ज्यांना आपलं भविष्य माहिती नाही ते महाराष्ट्राचं भविष्य ठरवायला...

Uddhav Thackeray : ‘ज्यांना आपलं भविष्य माहिती नाही ते महाराष्ट्राचं भविष्य ठरवायला निघाले आहेत’

आज 40 रेडे गुवाहाटीला नवस फेडायला गेले आहेत. 40 रेडे मी नव्हे त्यांच्या मंत्र्यानीच म्हटले आहे. गेल्या आठवड्यात ते हात दाखवायला गेले होते. ज्यांना आपलं भविष्य माहिती नाही ते महाराष्ट्राचं भविष्य ठरवायला निघाले आहेत. आपले व्यवस्थित चाललेलं सरकार त्यांनी पाडले, त्यांना गुवाहाटीला जावून आशिर्वाद घ्यायची गरज लागली, असा घणाघाती हल्लाबोल आज उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर केला. यावेळी ते म्हणाले, ते आशिर्वाद घ्यायला तिकडे गेले पण मी बुडढाण्यात शेतकऱ्यांचे, माता भगिनींचे आशिर्वाद घ्यायला आलो आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले.

यावेळी ठाकरे म्हणाले, आज संविधान दिन आहे. पण आज संविधान, लोकशाही सुरक्षित आहे का हा देखील प्रश्न आहे, चार दिवसांपूर्वी मी आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आलो होतो. त्यावेळी मी एक प्रश्न उपस्थित केला होता. आज लोकशाही धोक्यात आहे. आपले सरकार व्यवस्थित चाललं होत पण ते पाडलं. पण हे सरकार पाडले कसे. नितीन देशमुख ला ते घेवून गेले होते. नितीन देशमुख म्हणाले मला कापले तरी मी परत जाणार..जे गेले त्यांना कसे नेले हे सर्वांना माहिती आहे. भावना गवळी यांचे नाव न घेता उद्धव ठाकरे म्हणाले, ताईंना आपण चारदा खासदार केले. पण ताईना धमक्या दिल्या. ताईंना धमक्या देण्यासाठी मुंईतून दलाल जात होते. पण ताई हुशार होत्या, त्यांनी पंतप्रधानांनाच राखी बांधली, तो फोटो व्हायरल केला. आता ईडीची काय धमक आहे त्यांना अटक करायची, असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले.

भाजप हा आयात पक्ष आहे. भाकड पक्ष आहे. चंद्रकातं पाटील म्हणाले होते हृदयावर दगड ठेवून मुख्यमंत्री पद दिले. भाजप हा पक्ष आहे की चोर बाजार आहे ? बाहेरच्या पक्षातून नेते घ्यायचे आणि आपल्यासमोर उभा करायचे अशी जोरदार टीका देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. गद्दार बाळासाहेब ठाकरे यांचे नाव फोटो वापरत आहेत. इथल्या गद्दार आमदार खासदारांच्यात हिंमत असेल तर त्यांनी हिमतीवर निवडूण येण्याचे दाखवावे, असे आव्हान देखील यावेळी ठाकरे यांनी बंडखोरांना दिले.

महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातच्या निवडणूकीसाठी गुजरातला नेले. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सोलापूर अक्कलकोटवर हक्क सांगिलतला आहे. पुढच्यावर्षी कर्नाटकतच्या निवडणूका त्यामुळे पंतप्रधान त्यांना ४० गावे देणार का असा सवाल करतानाच उद्धव ठाकरे म्हणाले, हे मुख्यमंत्री म्हणतील ४० तर गावे आहेत जाऊद्या.. पंतप्रधान पाकव्याप्त काश्मिर घेणार आहेत, असे म्हणतील. मला भीती आहे सोलापूर कर्नाटकात गेला तर आमचा विठोबा देखील कर्नाटकमध्ये जाणार का आमचे अक्कलकोटचे स्वामी देखील कर्नाटकात जाणार का ?, राज्यपालांनी छत्रपतींचा अपमान केला, मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांचा निषेध नव्हे तर त्यांची बॅग पॅक करुन त्यांना परत पाठवायला हवे होते. मला राज्यपाल म्हणून आदर आहे. पण तुम्ही जर आमच्या दैवतांबद्दल बोलणार असाल तर मी गप्प राहणार नाही. असा इशारा देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.
यावेळी ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांचा देखील समाचार घेतला ते म्हणाले, अब्दुल गटार यांनी सुप्रिया सुळे यांचा अपमान केला. महिलेचा अपमान केला. मी मुख्यमंत्री असतो तर लाथ मारुन घालवले असते. पण तुम्ही शेपट्या घालून बसत आहात. एकनाथ शिंदे यांना इशारा देत ते म्हणाले तेव्हा आम्ही हिंदुत्वासाठी बाहेर पडलो असे म्हणाला होता. आता हिंमत असेल तर तुम्ही म्हणून दाखवा आम्ही सरकारमधून बाहेर पडतो. यावेळी शिंदे सरकावर टीका करताना ते म्हणाले, आज शहिद दिनी नवस ते फेडायला गेले, खोके सरकार आल्यापासून पणवती लागली आहे. १ जूलैपासून हजारभर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. अतिवृष्टी झाली तेव्हा गुडघाभर पाण्यातून शेतकरी विचारत होता, दिवाळी आहे काय खायचं,
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. त्यांच्याकडे लक्ष नाही. चिखलीतीत गजानन साळुंखेने पाच एकर सोयाबीन लावले पण मिळाले. पाच रुपये मीळाले. मुख्यमंत्री झाल्यावंर कर्ज मुक्त केले, असे देखील ठाकरे यावेळी म्हणाले.

हे सुद्धा वाचा :

Aditya Thackeray : आदित्य ठाकरे म्हणाले, सरकार पडेल आणि मंत्रीमंडळ विस्तार होईल

Eknath Shinde : कामाख्या देवीला रेड्याचे बळी देतात का ?, एकनाथ शिंदे काय म्हणाले ऐका!

अभिनयच नव्हे तर शिक्षणात देखील या सेलिब्रिटींचा आहे डंका

उद्धव ठाकरे यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांचा देखील चांगलाच समाचार घेतला, मुख्यमंत्री शेतात रमल्याचा व्हिडीओ दिवाळीत व्हायरल झाला. पण हेलिकॉप्टरने शेतात जाणारा मुख्यमंत्री दिसला मग माझा प्रत्येक शेतकरी असा केव्हा होणार, माझा शेतकरी कधीतरी कार ने शेतात जाईल का.. तुम्ही ज्योतिषाकडे हात दाखवायला जाता पण कष्टकरुन माझ्या शेतकऱ्याच्या हाताला घट्टे पडले आहेत, त्याच्या हातावरच्या रेषा पुसल्या आहेत. शेतकरी टाहो फोडत असताना तुम्ही कधी प्रेस ला घेऊन त्याच्या शेतावर गेला का असा सवाल देखील त्यांनी केला. आमचे सरकार असताना मला घराबाहेर पडत नाही म्हणत होते. पण कोरोना काळात देश पातळीवर सर्वे झाला त्यात पहिल्या पाच मध्ये माझे नाव होते. तुम्ही घराबाहेर पडला ते एकदम सुरतवरून गुवाहाटीलाच पोहचला अशी टीका देखील उद्धव ठाकरे यांनी केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी