देवेंद्रजी व चंद्रशेखर बावनकुळेजी, आपण हुशार व कार्यतत्पर लोकप्रतिनिधी, नेते आहात असे आम्ही समजतो .परंतु आपल्यासारख्या जाणत्या व जबाबदार नेत्यांनी आमदार जयकुमार गोरे यांच्यासारखा उडाणटप्पू माणूस सामान्य लोकांना, बुद्धिजीवी, उच्च विद्याविभूषित लोकांना छळण्यासाठी मोकाट सोडला आहे. (Unpublished letter to Devendra Fadnavis, Chandrasekhar Bawankule)
जयकुमार गोरे हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे आहेत. त्यावेळी पतंगराव कदम व नंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांना बळ दिले होते. त्यामुळे हे महाशय आमदार म्हणून निवडून आले. असे असले तरी राज्यात काँग्रेस – राष्ट्रवादीची सत्ता असताना जयकुमार गोरे यांना पोलिसांनी अटक केली होती. Ips कृष्णप्रकाश यांनी जयकुमार गोरे यांना बेड्या ठोकल्या होत्या. थोडक्यात काय तर काँग्रेसच्या काळात पोलिसांचा सरकारकडून एवढा दुरुपयोग केला जात नव्हता. (Unpublished letter to Devendra Fadnavis, Chandrasekhar Bawankule)
पृथ्वीराज चव्हाण यांनी जयकुमार गोरे यांचे फाजिल लाड पुरविले नव्हते. गोरे यांचे एकेक उपद्व्याप बघितले तर त्यांच्यावर मोक्का लावला पाहीजे, इतकी गंभीर प्रकरणे जयकुमार गोरे यांनी केली आहेत.जयकुमार गोरे यांनी सगळीकडेच घाण करून ठेवली आहे तशी ती पत्रकारितेतही केली आहे. पत्रकारिता व पत्रकार याविषयी मी या पत्राद्वारे आपणास गंभीर बाबी सांगणार आहे. हे अनावृत्तपत्र आत्ताच लिहिण्याचे कारण म्हणजे तुमच्या जयकुमार गोरे यांची एक विकृती.
जयकुमार गोरे यांनी काल त्यांच्या प्रसिद्ध प्रमुख असलेल्या व्यक्तीमार्फत अत्यंत आक्षेपार्ह, गलिच्छ व संतापजनक असा मजकूर व्हायरल केला आहे. त्यात आमचा उल्लेख ‘दुकार खराट’ असा केला आहे. एवढंच नव्हे तर काहीही आधार व पुरावा नसताना आम्ही पैसे घेऊन बातमी प्रसिद्ध करतो असा बेछूट आरोप जयकुमार गोरे यांनी केला आहे. उकीरडयावर पत्रावळ्या चाटणारा पत्रकार असं बरच काही जयकुमार गोरे यांनी लिहून ते आपल्या प्रसिद्ध प्रमुखद्वारे व्हायरल केलंय.
महोदय, मी अतिशय नम्रपणे व अभिमानाने सांगू इच्छितो की ‘लय भारी’ या पोर्टलला Google News Initiative या उपक्रमाअंतर्गत सन २०२३ या वर्षाकरिता सामाविष्ठ करून घेण्यात आलं होतं .त्यासाठी ‘लय भारी’ ला घसघसीत अनुदानही मिळालं. मराठी भाषेमधील ‘लय भारी’ हे एकमेव पोर्टल आहे, ज्यांना पहिल्यांदाच अशा पद्धतीचे अनुदान मिळाले आहे. ‘लय भारी’ची झेप एवढ्यावरच थांबलेली नाही. २०२४ या वर्षाकरीता सुद्धा लय भारी ची’ची google News Initiative उपक्रमात निवड झाली आहे. (Unpublished letter to Devendra Fadnavis, Chandrasekhar Bawankule)
सलग दोन वर्ष असा सन्मान मिळवणारे ‘लय भारी’ हे मराठीतील एकमेव न्यूज पोर्टल आहे. आमचे कार्यालय मुंबईत आहे. असे असले तरी आम्ही मुळचे माण खटाव तालुकातील रहिवासी आहोत आपल्या या भूमिपुत्राचे जयकुमार गोरे यांनी कौतुक करणारे एक साधे पत्र तरी द्यायला हवे होते. पण मुळात गोरे यांना दादागिरी, अरेरावी, दांडगाई, हम करे सो कायदा यातच स्वारस्य असते. त्यामुळे रचनात्मक गोष्टीकडे वेळ देण्यात त्यांना स्वारस्य नसते.
आमचे हे यश जयकुमार गोरे बघतही नाहीत, अन् बिनबुडाचे ‘पैसे खाल्ले’ असा मोघम आरोप करतात. पैशाचा विषय निघाला म्हणून मी जयकुमार गोरे यांचं एक पितळ उघडं पाडतो.
महोदय, जयकुमार गोरे यांना आता अचानक पत्रकारांचे महत्त्व लक्षात आले आहे. त्यासाठी ते स्थानिक पत्रकारांना वार्तांकन करण्यासाठी बोलवत असतात. त्यासाठी ते पत्रकारांना २ हजार रुपये लाच देतात. त्यांची व्हाऊचवर स्वाक्षरी सुद्धा घेतात. म्हणजे पत्रकारांना लाचार बनवायचं, पत्रकाराने पैसे घेतलेत हे बोंबलून सांगण्यासाठी व्हाऊचवर सहीचा पुरावा सुद्धा तयार करायचा.
वार्तांकनासाठी दोन हजार रुपयांची लाच देणारा जयकुमार गोरे हा जगातील एकमेव आमदार असेल. सुदैवाने बहुतांश स्वाभिमानी पत्रकार असे दोन हजार रुपयांचे तुकडे घेत नाहीत. अनेकजण जयकुमार गोरे यांचे वार्तांकन करतात पण त्यांच्याकडून अशी दोन हजाराची लाच घेत नाहीत. दोन हजाराची लाच घेऊ नये हे पत्रकारांना कळतं. पण जयकुमार कुमार गोरे हे कायदेमंडळाचे सदस्य आहेत. दोन हजार रुपये पत्रकारांना देणे केवळ बेकायदेशीरच नाही तर ते अनैतिक व पत्रकारांना लाचार बनवणारे, बुद्धिवंतांचा अतिशय वाईट पद्धतीने अपमान करणारे आहे.
लोकमान्य टिळकांना केसरी पेपर सुरू करायचा होता तेव्हा सयाजीराव गायकवाड यांनी आपला पुण्यातील वाडा देवून टाकला. आमच्या माण खटावमध्ये सुद्धा औंधाच्या राजाने छापखाना सुरू करून साहित्यिकांना मदत केली होती.
पण हे जयकुमार गोरे पत्रकारांना बळकट करण्याऐवजी त्यांना लाचार करतात.
विकृत जयकुमार गोरे यांनी अतिशय घाणेरड्या पद्धतीने माझ्यावर विकारी फुत्कार सोडले आहेत. त्यामुळे त्यांचे हे पितळ मी उघडे पाडत आहे. महोदय, आम्ही गेले काही दिवस माण खटाव मतदार संघ पिंजून काढत जयकुमार गोरे यांचे एकापेक्षा एक घोटाळे व गुंडगिरीचे पुरावे लोकांसमोर आणत आहोत. त्यामुळे जयकुमार गोरे यांना माण खटाव मध्ये तोंड दाखवायला जागा राहिली नाही. पत्रकार हे आरशाचे काम करीत असतात. जयकुमार गोरे यांनी आरशात पाहून स्वतःच्या तोंडावर लागलेलं डांबर पुसायला पाहिजे. पण ते तसं करीत नाहीत. उलट आरसा दाखवला म्हणून आमच्या मागे दादागिरी करीत लागले आहेत.
आमची बातमी किंवा व्हिडिओ जयकुमार गोरे यांना पटत नसतील तर त्यांनी रीतसर खुलासा पाठवायला हवा. पण गोरे महाशयांनी आजपावेतो एक सुद्धा खुलासा पाठविलेला नाही. त्यांनी एक कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्यात त्यांनी ‘लय भारी’ च्या प्लॅटफॉर्मवरील व्हिडिओ काढून टाकण्याची मागणी केली आहे. त्यांनी आम्हास पाठवलेली कायदेशीर नोटीस हा आम्ही आमचा सन्मान समजतो. जयकुमार गोरे हे आडदांड, दादागिरी करणारे आरेवारी करणारे व्यक्तिमत्व आहे. त्यांनी गेले १५ वर्षे गुंडगिरी पोसली. अशा या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने कायद्याचा अवलंब केला हे माझ्या पत्रकारितेचे छोटेसे यश समजेन.
महोदय, जयकुमार गोरे यांचा विकृत बुद्धीचा आणखी एक पुरावा देतो. सचिन शिंगाडे नावाचे एक नवोदित पत्रकार आहेत. ते माण तालुक्यातील छोटाशा गावातील आहेत. सचिन शिंगाडे यांचे यश तोंडात बोटे घालायला लावणारे आहे. तब्बल १.९२ लाख सबस्क्राईबर्स सचिन शिंगाडे यांच्या यूट्यूब चैनलला आहे. अनेक अनुभवी व कसलेल्या पत्रकारांनाही एवढा प्रभावी चैनल काढायला जमलेला नाही. आमच्यापेक्षाही काकणभर सरस कामगिरी सचिन शिंगाडे या नवख्या पत्रकाराने केली आहे. अशा या बुद्धिमान तरुणाचे जयकुमार गोरे यांनी कौतुक करायला हवे. एखादा पुरस्कार देण्याचे औदार्य त्यांनी दाखवायला हवे. पण इतके सज्जन वागतील ते जयकुमार गोरे कसले? (Unpublished letter to Devendra Fadnavis, Chandrasekhar Bawankule)
जयकुमार गोरे यांनी तर सचिन शिंगाडे यांचा काटा काढण्याचेच ठरवलेय. सचिन शिंगाडे यांना चार वेळा मारहाण झालीय. एकदा त्यांच्या नाका तोंडातून रक्त आले. एकदा पाठीवर वळ उठले. एकदा कानाखाली मारली. माजी नगराध्यक्ष विजय धट यांनी अडवून दम दिला. मोबाईल हिसकावून घेतला. मोबाईल मधील डाटा डिलीट केला.
महोदय, आमच्या माण-खटावमध्ये औध नावाचे पूर्वी संस्थान होते. या संस्थानामध्ये ग.दी. माडगूळकर यांनी शिक्षण घेतले होते.ग.दी. माडगुळकर हे खोडकर होते. पण औंध संस्थानाच्या महाराजांनी ग.दी. माडगूळकरांना त्रास दिला नाही. उलट तू भविष्यात फार मोठा होशील, असे भाकी वर्तवले,व ते खरे ठरले.
महोदय,
तुमचे जयकुमार गोरे हे मुळातच टवाळखोर. त्यामुळे त्यांना इतिहास वाचन ज्ञान वृद्धीगत करणे असल्या गोष्टींमध्ये काडीमात्र रस नाही. सचिन शिंगाडे यांचं भविष्य उज्वल आहे याचाच धसका कमी बुद्धीच्या जयकुमार गोरे यांनी घेतला. त्यांनी सचिनला भर कार्यकर्त्यांमध्ये धमकी दिली. तुला मस्ती आली आहे का? तू ओबीसी आहे म्हणून तुला सोडलं अशा भाषेमध्ये दरडावले. तुला भर चौकात मारेन, असाही दम भरला.
सचिन शिंगाडे यांचा नाका तोंडातून रक्त आले, तेव्हाच पोलिसांनी ‘पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करायला हवा होता. पण सातारची संपूर्ण पोलीस यंत्रणाच जयकुमार गोरे यांची लाचार आहे. पोलीस अधिक्षक समीर शेख हे जयकुमार गोरे यांच्या कुत्र्याला बंगल्यावर बिस्किटे घेऊन जातात, असे लोकं बोलतात. हे गंमतीने बोलले जाते की त्यात वस्तूस्थिती आहे हे खरंतर समीर शेख आणि जयकुमार गोरे यांनी सांगायला हवे.
सचिन शिंगाडे हा मेंढपाळाचा मुलगा आहे. अशा वंचित घटकातील नवख्या पत्रकाराला गुंडांकरवी मारहाण करणे, स्वतः जयकुमार गोरे यांनी धमकी देणे हे खूपच संतापजनक आहे.
एकनाथ वाघमोडे नावाचा दुसरा एक पत्रकार आहे. एकनाथ वाघमोडे व जयकुमार गोरे यांचे भाऊ अंकुश गोरे यांचे जुने एक संभाषण व्हायरल झाले आहे. यामध्ये अंकुश गोरे अत्यंत घाणेरड्या शब्दात पत्रकार वाघमोडे यांना दमदाटी करीत आहे. धक्कादायक म्हणजे अंकुश गोरे बोलत असताना त्यांना मार्गदर्शन करताना एक महिला अधिकाऱ्याचा आवाज ऐकू येत आहे . असा संशय आहे की हा आवाज प्रांताधिकारी यांचाच आहे. यावरून स्पष्ट लक्षात येत आहे की महिला अधिकारी पत्रकारांना दमदाटी करण्यासाठी अंकुश गोरे यांना प्रवृत्त करीत आहेत. संतापजनक म्हणजे अतिशय घाणेरड्या शब्दात अंकुश गोरे बोलत असताना संबंधित महिला अधिकाऱ्यांना या गलिच्छ शब्दात काहीही आक्षेपार्ह वाटत नाही. आमदार जयकुमार गोरे, सरकारी अधिकारी व माफिया यांचे मेतकूट कसे जमले आहे याचेच हे उदाहरण आहे. एकनाथ वाघमोडे हा पत्रकार सुद्धा मेंढपाळाचाच. धनगर मेंढपाळ यांची मते घ्यायची, ह्या समाजातील तरुणांना भांडण करण्यासाठी सोबत घ्यायचं, त्यांचा दुरुपयोग करायचा. पण या धनगर समाजातील हुशार लोकांना धमक्या द्यायच्या असे उद्योग जयकुमार गोरे आणि त्यांची पिल्लं करीत आहेत.
महोदय,
मी स्वतः साधारण पंधरा दिवस गावी होतो वार्तांकनासाठी उघडपणे फिरू शकत नाही अशी तेथील स्थिती आहे. आम्ही केलेले सगळे व्हिडिओ आपण पहावेत आम्ही आठवडी बाजारातही गेलो. वरकुटे मलवाडी इथे जयकुमार गोरे यांचे गावगुंड समर्थक माझ्या अंगावर आले त्यात किरण जाधव नावाचा वाळू माफिया होता.
माझं चालू शूटिंग त्यांनी बंद पाडलं .बाजारात बसलेल्या सामान्य शेतकऱ्यांनाही प्रश्न विचारू दिले जात नव्हते. आमदारांचे नाव घ्यायचे नाही अशी दादागिरी केली जात होती. निवडणुकी संदर्भात वार्तांकन करताना आमदारांच्या कामाविषयी प्रश्न विचारले तर तोंड दाबण्यासाठी जयकुमार गोरे यांनी गावोगावी गुंड व माफिया ठेवलेले आहेत. हे गुंड व माफिया या सामान्य लोकांना दहशतीखाली ठेवत असतात. त्यामुळे वार्तांकन करताना मला बऱ्याच अडचणी आल्या. मायणी येथे सुद्धा तीन-चार गुंडांनी त्रास दिला. त्यांची पद्धत न्यारीच होती. मी ज्यांची प्रतिक्रिया घ्यायला जायचो त्यांना ते बोलू देत नव्हते.
या गुंडापासून संरक्षण म्हणून मी वडूज पोलीस ठाण्यात निरोप दिला होता. पोलिसांच्या सांगण्यानुसार मी कारंडे नावाच्या हवालदाराला फोन केला. तुम्ही शूटिंग करू नका तिथली लोकं चांगली नाहीत असे कारण त्यांनी सांगितले.
महोदय,
जयकुमार गोरे यांचे इतर पराक्रम यावर मी काहीच तुम्हास सांगणार नाही. सर्वोच्च न्यायालयानेच या महाशयांची संभावना ‘जनावरांवर भुंकणारा कुत्रा’अशी केलेली आहे. मुंबई उच्च न्यायालय तुमच्या गृह खात्याचे वाभाडे काढत आहे. तरीही तुमचे पोलीस अधिक्षक समीर शेख जयकुमार गोरे यांची लाचारी करीत आहेत.
समीर शेख यांची मुंबईत बदली झाली होती. साताऱ्यापेक्षा मुंबई हे कोणत्याही अधिकाऱ्यासाठी भूषणच असेल. पण फडणवीस साहेब आपण शेख यांची झालेली बदली अवघ्या काही तासांतच रद्द केली याचे कारण काय ?
जयकुमार गोरे यांच्यावर सध्या मुंबई उच्च न्यायालयाची टांगती तलवार आहे. जयकुमार गोरे यांनी कोरोना काळात मृत रूग्णांना जिवंत दाखवून सरकारी अनुदान हडपले आहे. त्यावरून मुंबई उच्च न्यायालयाने तुमच्या पोलीस खात्याला कानपिचक्या दिल्या आहेत. न्यायालयाने पोलिसांना निपक्षपाती चौकशी करायला सांगितली आहे. पण पोलीस पक्षपातीपणे काम करीत असल्याचे गंभीर पुरावे आमच्या हातात आहेत. जयकुमार गोरे यांची पक्षपाती० चौकशी करण्यासाठी ips समीर शेख यांच्या एवढा दुसरा कोणताही अधिकारी खालची पातळी गाठणार नाही. असा हा खालची पातळी गाठणारा अधिकारी माझ्यासाठी राहू द्या. नाहीतर मला तुरुंगात जावे लागेल अशीच काहीतरी विनवणी जयकुमार गोरे यांनी तुमच्याकडे केली असावी.
जयकुमार गोरे हे असे भानगडबाज आहेत. त्यांच्या भानगडींना मदत करणारी व्यक्ती अडचणीत येते.
जयकुमार गोरे हे तुमच्या पक्षासाठी अवदसा आहेत. त्यांना किती डोक्यावर घेणार आहात? महत्त्वाचं म्हणजे त्यांनी २००६ सालापासून पत्रकारितेचं अवमूल्यन करून टाकलं आहे. पत्रकारांना धाकदपटशा दाखवायचे आणि तुकडे टाकून लाचार करायचे. जे पत्रकार फारच हिरिरीने काम करतात त्यांच्या मागे गुंड सोडून द्यायचे. पत्रकाराने मांडलेले मुद्दे खोडून काढण्याऐवजी टवाळखोर कार्यकर्त्यांकरवी सोशल मीडियात पत्रकारांची निंदानालस्ती करायची. कंबरेखालचे वार करायचे. असे अत्यंत घाणेरडे उद्योग जयकुमार गोरे करत असतात.
खरंतर माण खटाव मधील वार्तांकन संपवून मी मुंबईला आलो आहे. पण त्यानंतर ही त्यांचे कार्यकर्ते फोन करून धमक्या देतात. जयकुमार गोरे यांनी सांगितल्याशिवाय कार्यकर्ते फोन करीत असतील असे आम्हास वाटत नाही.
खरंतर ,आम्ही जयकुमार गोरे यांच्या विरोधात सातत्याने लिहीत आहोत ,बोलत आहोत. त्यामुळे आम्हास त्यांची बाजू ऐकून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही जयकुमार गोरे यांना मुलाखत देण्यासाठी जाहीर आवाहन केलेले आहे. आम्ही बावनकुळे साहेबांना ही फोन करून जयकुमार गोरे आम्हास मुलाखत देत नाहीत. पण पत्रकारिता दाबवण्याचा प्रयत्न करतात ,धमक्या देतात असे सांगितले. त्यावर आपण जयकुमार गोरे यांना मला मुलाखत द्यायला सांगितली असावी. पण जयकुमार गोरे यांनी मुलाखत दिलीच नाही.
महोदय, मी आता पुन्हा गावी जाणार आहे. मागील वेळी जयकुमार गोरे यांच्या गुंडांनी मला लोकांच्या प्रतिक्रिया व्यवस्थितपणे घेऊ दिल्या नव्हत्या. त्यामुळे यावेळी तरी पोलीस गुंडावर नियंत्रण ठेवतील व आम्हास आमची पत्रकारिता व्यवस्थित करता येईल, अशी अशा बाळगतो. जयकुमार गोरे यांची लाचारी पत्करलेले पोलीस थोडे तरी संविधानाशी बांधलका जपतील व कायद्याचे काम करतील अशी अशा बाळगतो.
आपल्या माण खटावमधील कारस्थानांनी संतापलेला,
तुषार खरात