28 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रचित्रा वाघ खुलासा करा, अन्यथा एकतर्फी कारवाई; राज्य महिला आयोगाची नोटीस

चित्रा वाघ खुलासा करा, अन्यथा एकतर्फी कारवाई; राज्य महिला आयोगाची नोटीस

उर्फी जावेद  मुंबईच्या रस्त्यावर नंगानाच करते असा आरोप करत भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उर्फीवर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र महिला आयोगाने त्याची दखल घेतली नसल्याचा आरोप राज्य महिला आयोगावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर उर्फी जावेद वाद (Urfi Javed Controversy) प्रकरण तापले असून महिला आयोगाने चित्रा वाघ यांना नोटीस पाटवल्याची महिती राज्य महिला आय़ोगाच्या  (Maharashtra State Commission for Women) अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली. तसेच चित्रा वाघ यांनी याप्रकरणी खुलासा न केल्यास, त्यांचे काहीही म्हणणे नाही असे गृहीत धरुन राज्य महिला आयोग एकतर्फी निर्णय घेईल असे देखील रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यावेळी म्हणाल्या. (Urfi Javed Controversy; Maharashtra State Commission for Women notice to Chitra Wagh)

गुरूवारी पत्रकार परिषदेत चित्रा वाघ यांनी अभिनेत्री तेजस्विनी पंडीतला महिला आयोगाने नोटीस पाठविल्याचे म्हटले होते. त्यांच्या या आरोपाचे देखील रुपाली चाकणकर यांनी खंडण केले. चाकणकर म्हणाल्या महिला आयोगाने तेजस्विनी पंडित हिला नोटीस पाठवली नाही, तर दिग्दर्शक संजय जाधव यांना नोटीस पाठवली होती. उर्फी जावेद सोबत राज्य महिला आयोग देखील बेफाम झाला आहे, अशी म्हणायची परिस्थिती आज महाराष्ट्रातील महिलांवर आली आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही असा घणाघात त्यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेत केला होता.

हे सुद्धा वाचा 

उर्फी सोबत महिला आयोगसुद्धा बेफाम झालाय का…; चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

उर्फी जावेदच्या हातात अखेर बेड्या…

उर्फी जावेदचे चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर; म्हणाली …म्हणून मला दोषी ठरवतात

पत्रकार परिषदेत चित्रा वाघ म्हणल्या, एखादी महिला अशापद्धतीने महाराष्ट्रातल्या मुंबईमध्ये उघडीनागडी फिरत असताना समाजमाध्यमांमध्ये हे व्हायरल होत असताना त्याची महिला आयोगाने स्युमोटोमध्ये दखल का घेतली गेली नाही? समाजमाध्यमांवर एवढी मोठी अश्लिल आणि घाणेरडे, ओंगळवाणे व्हिडीओ व्हायरल होत असताना त्याच्यावर दखल घ्यायला महिला आयोगाला वेळ नसेल तर मग महिला आयोगावर तीथे बसण्याचा सुद्धा कुणाला अधिकार नाही. हे सुद्धा मला सांगायचे असे चित्रा वाघ म्हणाल्या होत्या तसेच त्यांनी अनुराधा वेबसिरीजच्या पोस्टरप्रकरणी अभिनेत्री तेजस्विनी पंडीत आणि त्यांच्याबरोबर दिग्दर्शक संजय जाधव यांना त्यांनी नोटीस पाठवली होती असे देखील पत्रकारपरिषदेत म्हटले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी