30 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रविदर्भNitin Gadkari : नितीन गडकरींनी आपल्याच सरकारविरोधात दाखविला 'अविश्वास' !

Nitin Gadkari : नितीन गडकरींनी आपल्याच सरकारविरोधात दाखविला ‘अविश्वास’ !

शेतकऱ्यांनो या सरकारच्या भरोशावर राहू नका ! असा मोलाचा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी ॲग्रो व्हिजन फाऊंडेशनच्या कार्यक्रमात बोलतांना शेतकऱ्यांना दिला.

शेतकऱ्यांनो या सरकारच्या भरोशावर राहू नका ! असा मोलाचा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी ॲग्रो व्हिजन फाऊंडेशनच्या कार्यक्रमात बोलतांना शेतकऱ्यांना दिला. नितीन गडकरी हे आता केंद्र सरकार प्रमाणे राज्य सरकारवर नाराज असल्याचे अधोरेखीत झाले आहे. अलिकडे अनेक वेळा आपल्या भाषणांमध्ये न‍ितीन गडकरी हे सरकारचे कान टोचतांना दिसत आहेत. ते उघड उघड नाराजी दाखवत नसले तरी त्यांच्या बोलण्यातून ती लपत नाही हे मात्र खरे आहे. त्यांनी अनेकवेळा आपल्या पक्षातील काही धोरणांवर अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे. त्यानंतर त्यांना दोन पावले मागे यावे लागले. परंतु त्यांची पक्ष निष्ठा मात्र कायम आहे.

जगात राजकारणा श‍िवाय करण्यासारखे बरेच काही आहे असे सुचक वक्तव्य देखील त्यांनी यापूर्वी केले होते. त्यावेळी राजकीय वतुळात त्यांच्या विषयी खूप चर्चा रंगली होती. नागपूर येथे ॲगो व्हिजन फाऊंडेशनच्या कार्यक्रमात बोलतांना नितीन गडकरींनी राज्य सरकार विरोधात टोलेबाजी करत, शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांना बाजारपेठेचे गण‍ित कसे जुळवून आणायचे ते त्यांनी यावेळी सांगितले. त्यावेळी ते म्हणाले की, या सरकारच्या भरोशावर राहू नका. यावेळी त्यांनी स्वत:च्या शेतीचा अनुभव सांगितला.

हे सुद्धा वाचा

LayBhari Exclusive : मुख्यमंत्र्यांची राजकीय सभा, गर्दी जमविण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहण्याचा लेखी आदेश !

Shrirampur News : अदिवासी तरुणाचा खून, भाजपचे नेते उतरले रस्त्यावर

Maharashtra Politics : ‘भाजपची लोकं डोक्यावर पडली आहेत’

आपण स्वत: ठरवा आपल्या गाडीतून दरोरोज रात्री माल कसा मार्केटमध्ये येईल. माझा माणूस मला 25 रुपयांच्यावर मालाला भाव देतो. त्यामुळे दोन दिवसांमध्ये 30 ते 40 हजार रुपये मिळतात. स्वत:चे मार्केट स्वत: शोधले तरच शेतीत फायदा आहे. जुन, जुलै, ऑगस्टमध्ये अनेक ठिकाणी महापूरामुळे पीकांचे नुकसान झाले. शेत जमिनीचे नुकसान झाले होते. त्या शेतकऱ्यांना 3 हजार 501 कोटी रुपये निधी देण्यास सरकारने मंजूरी दिली असून, बहुतांश निधी हा विदर्भ मराठवाडयाला देण्यात आला आहे. मी सरकारमध्ये आहे म्हणून तुम्हाला सांगतो. आपला विश्वास सरकारवर असतो नाहीतर परमेश्वरावर असतो.

परंतु आपल्याला काम हे करावेच लागते. त्यावर आणखी एक उदाहरण त्यांनी दिले की, सोयाबिन लागवड करणाऱ्या ज्या शेतकऱ्यांनी सीड प्रोसेसिंग केले होते. त्यांच्या पीकाला किड लागली नाही. आशा प्रकारे शेतकऱ्यांनी शेतीमध्ये प्रयोग करणे गरजेचे आहे. तसेच शेतकऱ्यांनी संघटीत होण्याची गरज आहे. आता उसासाठी हार्वेस्टर घेण्याची योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकारला सांगितली आहे. त्यासाठी सीएनजीचा वापर करणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी