29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रविदर्भNavneet Rana भांडकुदळ नवनीत राणांच्या विरोधात निवृत्त पोलीस संघटना मैदानात !

Navneet Rana भांडकुदळ नवनीत राणांच्या विरोधात निवृत्त पोलीस संघटना मैदानात !

बोलभांड, भांडकुदळ अशी विशेषणे ज्यांना चपखल बसतात, त्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या विरोधात आता निवृत्त पोलीस अधिकारी मैदानात उतरले आहेत.

बोलभांड, भांडकुदळ अशी विशेषणे ज्यांना चपखल बसतात, त्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या विरोधात आता निवृत्त पोलीस अधिकारी मैदानात उतरले आहेत. काही दिवसांपूर्वी अमरावतीमधील एका पोलीस ठाण्यात जावून नवनीत राणा यांनी आकांडतांडव केले होते. नळावर पाणी भरण्यासाठी भांडावे तसे त्या मराठी पोलीस अधिकाऱ्यांसोबत अद्वातद्वा भांडत होत्या. संबंधित पोलीस अधिकाऱ्याने संयमाची भूमिका घेतलेली असतानाही नवनीत राणा मात्र त्यांच्यावर खेकसत होत्या. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राणा यांच्या विरोधात समाजातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. सरकारी सेवेतील अधिकाऱ्यांवर अशा पद्धतीने धावून जाणे योग्य नसल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या. नवनीत राणा यांच्यावर कारवाई झाली पाहीजे, अशी मागणी सामान्य लोकांकडून होवू लागली आहे.

आता पोलीस अधिकाऱ्यांची निवृत्त संघटनाही मैदानात उतरली आहे.निवृत्त संघटनेच्या अधिकाऱ्यांनी आज एकत्रित येवून अमरावती पोलीस मुख्यालयासमोर निदर्शने केली. पोलिसांना राजकारणाशी काही देणेघेणे नाही. पोलीस नावाचा माणूस हा मरत मरत जगत असतो. त्याला दुसरे काही देवू नका. पण किमान त्याच्या स्वाभिमानाशी तरी खेळू नका, अशा भावना आंदोलक निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केल्या.नवनीत राणा या लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी आपल्या वागण्यातून अधिकारांची महानता दाखवायला हवी. पोलीस आहेत म्हणून राजकीय नेते समाजामध्ये फिरू शकतात. पोलीस सोडून त्यांनी समाजात फिरून दाखवावे, असे आव्हानही या आंदोलकांनी दिले.

हे सुद्धा वाचा

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याच मंत्र्यांना झापले !

IPS transfers : IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या लवकरच, नांगरे पाटील यांची उचलबांगडी होणार!

Sanjay Dutt :खलनायकाच्या भूमीकेसाठी संजय दत्त यांना 10 कोटींची ऑफर

नवनीत राणा राजापेठ पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबत चुकीच्या पद्धतीने वागल्या आहेत. याउलट पोलीस अधिकारी त्यांच्यासोबत सौजन्याने व सन्मानाने वागले आहेत. त्यामुळे नवनीत राणा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आम्ही आयुक्तांना भेटून करणार आहोत, असेही या निवृत्त अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
रवी राणा यांनी पोलीस आयुक्त आरती सिंग यांच्यावरही आरोप केले आहेत. आरती सिंग महाविकास आघाडी सरकारला थैल्या पुरवायच्या असा राणा यांनी आरोप केला आहे. त्या अनुषंगाने आंदोलकांना विचारले असता ते म्हणाले की, हे राजकीय आरोप आहेत.

राजकीय आरोपांमध्ये किती तथ्य असते हे सगळ्यांनाच माहित आहे. बदल्यांचेही काही नियम आहेत. सिंग यांचा कालावधी पूर्ण झाला असेल तर नियमाप्रमाणे त्यांची बदली होईल. हा सरकारचा अधिकार आहे. त्यावर आम्ही काही बोलू इच्छित नाही.भाजप खासदार अनिल बोंडे यांनी पोलिसांना कुत्रे संबोधले होते. त्यावरही या आंदोलकांनी भावना व्यक्त केल्या. लोकप्रतिनिधींनी पोलिसांचा असा अपमान करू नये. पोलिसांच्या संरक्षणातच तुम्ही नेते वावरत असता. कोणताही नेता घराबाहेर पडताना पोलीस संरक्षणाची तजवीज योग्य प्रकारे झाली आहे की नाही हे पाहात असतो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी