30 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रविदर्भPushpa of Nagpur : नागपूरचा 'पुष्पा' पोलिसांच्या जाळयात सापडला

Pushpa of Nagpur : नागपूरचा ‘पुष्पा’ पोलिसांच्या जाळयात सापडला

पुष्पा चित्रपटात चंदन तस्करी कशी होते, हे दाखवण्यात आले आहे. त्यानंतर चंदन तस्करांना सगळे जण 'पुष्पा' (Pushpa) या नावाने ओळखू लागले आहेत.

चंदनाचे झाड हे भरपूर पैसा देणारे झाड आहे. त्यामुळे ते झाड कितीही घनदाट जंगलात असले तरी तस्कर तिथे पोहोचतात. अशी एकही जागा नाही की, तिथे चंदन चोर पोहोचले नाही. नागपूरच्या राजभवन परिसरातून एका चंदनाच्या झाडाची चोरी झाली होती. ते झाड चोरुन नेण्याऱ्या टोळीपैकी एक जण पोलिसांच्या जाळयात सापडला आहे. नागपूरच्या सीताबर्डी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पहाटेच्या वेळी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. पुष्पा चित्रपटात चंदन तस्करी कशी होते, हे दाखवण्यात आले आहे. त्यानंतर चंदन तस्करांना सगळे जण ‘पुष्पा’ (Pushpa) या नावाने ओळखू लागले आहेत.

नागपुरमध्ये चंदनाचे झाड कापून चोरी करण्याच्या घटनांमध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी चोरी झालेल्या परिसरात ते चोर पुन्हा आले. नागपूरच्या सिव्ह‍िल लाईन्स पर‍िसरातील एका बंगल्यामध्ये असलेले चंदनाचे झाड कापून ते चोरुन नेत होते. त्याच वेळी पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले. दोन चोरांपैकी एक चोर पळून गेला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्या ठिकाणावरून पोलिसांना एक चंदनाचा ओंडका देखील सापडला आहे. तसेच कट‍िंगसाठी वापरण्यात येणारे महत्ताचे साहित्य जप्त केले . चाेर  जालन‍ा जिल्ह्यातील असल्याचे उघड झाले आहे. मराठवाडयातील चोर विदर्भात येऊन तस्करी करतो. याचा अर्थ ही मोठी टोळी असल्याचा संशय पोलिसांना आहे.

पोलीस या टोळीच्या मागावर आहेत. या चोरीचे सुत्रधार हे राजभवन परिसरातून चंंदन चोरी करणारे आहेत का याचा शोध घेतला जात आहे. हे चंदन तस्कर चंदनाच्या झाडांची द‍िवसा रेकी करतात‍ आणि रात्रीच्या वेळी कटरने झाडे कापून नेतात. मात्र एक जण पोलिसांच्या जाळयात आडकला की, संपूर्ण टोळी सापडणे सोपे होते. चंदनाचे लाकूड खूप महाग विकले जाते. परदेशात देखील त्याला मोठी मागणी आहे. या लाकडापासून सुगंधी वस्तू, अत्तर, सौंदर्य प्रसाधने तसेच औषधे बनवली जातात.

हे सुद्धा वाचा

Sonia Gandhi : सोन‍िया गांधींचे 30 तारखेपर्यंत मौन

Mahesh Babu : सुपरस्टार महेश बाबूच्या आईचे निधन

The song : आभाळभर गाणी गाणाऱ्या गान ‘कोकीळे’ला मिळाली एका चौकात जागा

काही द‍िवसांपूर्वी नागपूरच्या राजभवन परिसरातून चंदनाच्या झाडाची चोरी झाली होती. हा परिसर तसा गजबजलेला असून, अतिसंवदेनशिल आहे. या परिसरात पोलिसांचा जागता पहारा असतो. त्यामुळे या ठिकाणी चोरी होणे म्हणजे पोलिसांना आव्हान दिल्या सारखेच आहे. शिवाय नागपूर ही राज्याची उपराजधानी असून, आपले उपमुख्यमंत्री नागपूरचे आहेत. त्यामुळे एवढया मोठया शहरात चंदनाच्या झाडीची चोरी होतेच कशी हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकूणच नागपूरच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर यामुळे प्रश्न निर्माण झाला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी