28 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रविदर्भRaj Thackeray : विलासरावांच्या दुर्लक्षामुळे बीएमडब्ल्यूचा प्रकल्प तामिळनाडूला गेला, आता फॉक्सॉन गुजरातला...

Raj Thackeray : विलासरावांच्या दुर्लक्षामुळे बीएमडब्ल्यूचा प्रकल्प तामिळनाडूला गेला, आता फॉक्सॉन गुजरातला का गेला याची चौकशी करा- राज ठाकरे

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)हे विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांनी नागपूरमध्ये आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर चर्चा केली. नुकत्याच गाजत असलेल्या फॉक्सकॉन प्रकरणावर देखील त्यांनी भाष्य केले. महाराष्ट्राचं लक्ष नसल्याने फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला असे त्यांनी सांगितले.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)हे विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांनी नागपूरमध्ये आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर चर्चा केली. नुकत्याच गाजत असलेल्या फॉक्सकॉन प्रकरणावर देखील त्यांनी भाष्य केले. महाराष्ट्राचं लक्ष नसल्याने फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला असे त्यांनी सांगितले. राज्यकर्त्यांना वाटते तसे ते वागतात. हे सगळे फ‍िसकटले कुठे कुठे याची चौकशी करण्यात यावी. प्रत्येक राज्यात उदयोधंदे यायला हवे परंतु आलेला उदयोग गेला का याची चौकशी करण्यात यावी. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा एक किस्सा सांगितला. अर्थात त्यावेळी काँग्रेसचे सत्ता होती.

1999 ते 2004 या काळातली ती घटना आहे. त्यावेळी बीएमडब्ल्यूचा प्रस्ताव घेऊन अधिकारी त्यांना भेटण्यासाठी आले होते. नेमके त्याचवेळी विलासराव देशमुखांना बाहेर जायचे होते. त्यामुळे त्यांनी अधिकाऱ्यांना मीटिंग घेण्यास सांगितले आणि ते निघुन गेले. त्यातले काही अधिकारी हे दाक्षिणात्य होते. बैठक निगेटिव्ह झाली. त्यामुळे महाराष्ट्रातल्या त्या दाक्षिणात्य अधिकाऱ्याने तामिळनाडूमध्ये संपर्क साधला. त्यानंतर तो प्रकल्प तिकडे गेला. आता बीएमडब्ल्युचा कारखाना तामिळनाडुमध्ये आहे.

अशा प्रकारे येणाऱ्या उदयोगावर जर सरकारचे लक्ष नसेल तर उदयोग दुसरीकडे जाणारच असे त्यांनी सांगितले. जर आता येणाऱ्या उदयोगासाठी कोणी पैसे मागीतले असतील, तर कोण कशाला येईल. जे उदयोग भारता येऊ इच्छीतात. ते पहिली निवड महाराष्ट्राची करतात. कारण इकडे  उदयोगांना वातावरण पोषक असे आहे. चांगली ऑफर दिली असेल तर ते गुजरातला गेले. त्यामुळे हे सगळं फ‍िसकटलं कुठे याची चौकशी व्हावी हा मुद्दा राज ठाकरेंनी यावेळी लावून धरला.

हे सुद्धा वाचा

Arvind Sawant : ‘यांची स्क्रिप्ट कोण लिहून देतं…’, अरविंद सावंताचा कडवा सवाल

ST Bus Crises : ‘लालपरी’ला लागली शिंदे सरकारची नजर, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Taiwan : सावधान ! ‘या’ देशाला पुन्हा त्सुनामीचा धोका

आज नागपूरमध्ये त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. तसेच पूर्वीची सर्व पदं त्यांनी बरखास्त केली. आता 26 तारखेला नवीन कार्यकारणी तयार करण्यात येईल. काही चुकीच्या गोष्टी घडत होत्या म्हणून कार्यकारणी बरखास्त केली. आता नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. सत्तांतरावरुन देखील त्यांनी टीका केली. पक्ष वाढण्यात स्वत:चे दुर्लक्ष झाल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

आणखी देान दिवस ते विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यानंतर ते कोल्हापूर मार्गे कोकण दौरा करणार असून, पुन्हा विदर्भात येणार आहेत. येऊ घातलेल्या महानगर पालिका न‍िवडणुकांसाठी राज ठाकरेंची मोर्चे बांधणी सुरू आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी